सोलापूर (प्रतिनिधी ) शहर गुन्हे शाखेच्या दक्ष व तत्पर पथकाने सात गुन्हे उघडकीस आणत पुन्हा एकदा उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. या कारवाईत मोटारसायकल चोरीचे सहा आणि मोबाईल चोरीचा एक असे एकूण सात गुन्हे उघडकीस आणले असून, तब्बल ₹4,30,000/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
रात्रगस्ती दरम्यान संशयितावर छापा
मा. वरिष्ठांच्या सूचनेनुसार ग्रेड पो.उपनिरीक्षक शामकांत जाधव आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार बापू साठे, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, वसिम शेख यांनी रात्रगस्त दरम्यान सोलापूर शहरातील रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी सुरू केली असता, दि. 20 नोव्हेंबर 2025 रोजी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, एक इसम कुमठा नाका परिसरातील क्रिडा संकुलाच्या मागे असलेल्या लेप्रसी कॉलनी येथे शाईन मोटारसायकलसह संशयास्पद स्थितीत थांबला आहे.
या माहितीनुसार तात्काळ छापा टाकण्यात आला असता, करणकुमार हरी राठोड (वय 38, रा. गणेशनगर, विजापूर रोड, सोलापूर) हा इसम ताब्यात घेण्यात आला. त्याच्या ताब्यातील होंडा शाईन मोटारसायकल (क्र. MH-13-EG-6737) बद्दल चौकशी केली असता, त्याने धक्कादायक खुलासा केला.
आरोपीचा गुन्ह्यांचा कबुलीजबाब
राठोड हा पूर्वी स्टुम फायनान्स कंपनीत टू-व्हिलर रिकव्हरी एजंट म्हणून काम करत होता. त्याने सांगितले की, फायनान्स न भरलेल्या वाहनांची वसुली करताना सहा मोटारसायकली उचलल्या मात्र त्या बँकेच्या डंपयार्डमध्ये जमा न करता स्वतःकडे ठेवल्या.
त्याच्या कबुलीजबाबानुसार त्याच्याकडून सहा मोटारसायकली जप्त करण्यात आल्या
अ.क्र. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम जप्त मोटारसायकल
1 सदर बझार 931/2025 भा.न्या.सं. 303(2) होंडा शाईन MH-13-EB-1395 (बदललेला क्र. MH-13-EG-6737)
2 सदर बझार 929/2025 भा.दं.वि. 379 होंडा शाईन MH-13-DU-6405
3 सदर बझार 930/2025 भा.दं.वि. 379 सुझुकी अॅक्सिस
4 फौजदार चावडी 842/2025 भा.न्या.सं. 303(2) हिरो एच.एफ. डिलक्स MH-13-DV-8046
5 फौजदार चावडी 843/2025 भा.न्या.सं. 303(2) बजाज पल्सर एन.एस.125 MH-25-BC-0285
6 फौजदार चावडी 841/2025 भा.न्या.सं. 303(2) सुझुकी अॅक्सिस MH-13-EH-6521
या सर्व मोटारसायकली चोरीच्या असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मोबाईल चोरीचाही गुन्हा उघड
दरम्यान, दुसऱ्या कारवाईत मूजाहीद हमीद मनियार (वय 19, रा. नवीन गोदुताई घरकुल, कुंभारी) या तरुणास दि. 16/11/2025 रोजी ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून ₹10,000/- किंमतीचा सॅमसंग गॅलक्सी A14 5G मोबाईल जप्त करण्यात आला. सदर मोबाईल चोरीबाबत सदर बझार पोलीस ठाण्यात गु.र.नं. 919/2025, भा.न्या.सं. 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
एकूण हस्तगत मुद्देमाल
संपूर्ण कारवाईत मोटारसायकल चोरीचे ६ आणि मोबाईल चोरीचा १ असा एकूण ७ गुन्ह्यांचा छडा लावण्यात आला असून, ₹4,30,000/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
वरिष्ठांचे मार्गदर्शन, पथकाचे कौतुक
ही यशस्वी कारवाई मा. श्री. एम. राजकुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे/वि.शा.), श्री. राजन माने, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे), आणि श्री. अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
कारवाईत ग्रेड पो.उप.नि. शामकांत जाधव व त्यांचे पथक — बापू साठे, राजेश मोरे, वसिम शेख, सुभाष मुंढे, सैपन सय्यद, सायबर शाखेतील प्रकाश गायकवाड आणि मच्छिंद्र राठोड यांनी उल्लेखनीय भूमिका बजावली.
पोलिस आयुक्तांचे अभिनंदन
सदर गुन्ह्यांचा छडा लावल्याबद्दल पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी संपूर्ण गुन्हे शाखा पथकाचे कौतुक केले असून, गुन्हे तपासात तत्परता राखल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
