सोलापूर (प्रतिनिधी ) नुकतेच नायब तहसीलदार संवर्गातील अधिकाऱ्यांना तहसीलदार या पदावर पदोन्नती देण्यात आली असून मंद्रूप (ता दक्षिण सोलापूर ) येथील नायब तहसीलदार जितेंद्र मोरे यांना सांगली येथील तहसीलदारपदी पदोन्नती मिळाली आहे जितेंद्र मोरे यांनी मंद्रूप येथे नायब तहसीलदार असताना सर्वसामान्य नागरिकांचे प्रशासकीय कामे मार्गी लावण्याचा आटोकाट प्रयत्न केला असून सामान्य नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यात आला असून नायब तहसीलदार जितेंद्र मोरे यांना प्रशासकीय कामाचा अनुभव देखील दांडगा असून त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना तहसीलदारपदी पदोन्नती मिळाली असून या निवडी बद्दल नूतन तहसीलदार जितेंद्र मोरे यांचे सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
