मोहोळ (प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समिती मोहोळ तालुक्याची बेगमपूर येथे बैठक घेण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सरचिटणीस बंडू तोडकर होते या बैठकित जेष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना आरोग्य योजना विमा योजना पत्रकारांसाठी घरकुल योजना ग्रामीण भागातील पत्रकारांना एसटी बसमधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चारचाकी वाहनास टोल मधून सूट राज्यातील युट्युब व पोर्टल ला शासकीय जाहिराती यादीवर नसलेल्या साप्ताहिक वृत्तपत्राना पूर्वी प्रमाणे जाहिराती खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल प्रकरणी वरिष्ठ अधिकारी मार्फत स्वतंत्र चौकशी पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण या सह राज्यातील पत्रकारांच्या विविध विषयावर चर्चा करण्यात येऊन आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला
*एकत्र आल्याशिवाय पत्रकारांचे प्रश्न सुटणार नाहीत*
राज्यातील पत्रकारांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार म्हणाले
*मोहोळ तालुक्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील*
मोहोळ तालुका मधील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असल्याची माहिती जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार यांनी बैठकित दिली आहे
यावेळी महाराष्ट्र पोलीस वार्ताचे संपादक अमोल कुलकर्णी मोहोळ तालुका उपाध्यक्ष शुक्राचार्य शेंडेकर संघटक महादेव शेवाळे वजीर मुलाणी अजय तोडकर उपस्थित होते.
