Type Here to Get Search Results !

CEIR Portal व तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास करुन सोलापूरातील गहाळ झालेले विविध कंपनीचे सुमारे ४६,२०,००० रु चे एकूण २३९ मोबाईल हॅन्डसेट हस्तगत.




सोलापूर (प्रतिनिधी ) केंद्र शासनाच्या दुरसंचार विभागाद्वारे गहाळ झालेल्या व चोरीस गेलेल्या मोबाईल हॅन्डसेटची माहिती मिळण्यासंदर्भात CEIR Portal सुरु करण्यात आले आहे. सदरील CEIR Portal द्वारे व तांत्रिक विश्लेषणाद्वारे सोलापूरातील गहाळ झालेल्या मोबाईल हॅन्डसेटची माहिती प्राप्त करुन घेवून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस आयुक्तालय, सोलापूर शहरकडील तपास पथके वेगवेगळ्या परजिल्हयात व परराज्यात पाठविण्यात आली होती. सदरील तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी CEIR Portal व तांत्रिक विश्लेषणाद्वारे अतिशय कुशलतेने तपास करून गहाळ झालेले विविध कंपनीचे सुमारे ४६,२०,०००/- रु चे एकूण २३१ मोबाईल हॅन्डसेट हस्तगत केले आहेत.


सदरची कामगीरी ही पोलीस आयुक्त .एम राज कुमार पोलीस उप-आयुक्त विजय कबाडे, मा.पोलीस उप-आयुक्त, श्रीमती अश्विनी पाटील, सर्व पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोह महंमद रफिक इनामदार, पोह संतोष पापडे, पोह एकनाथ उबाळे, पोह/शंकर भिसे, पोकों समाधान मारकड, पोकों संतोष वायदंडे, पोकॉ कल्लप्पा देकाणे, पोह खाजप्पा आरेवनवरु, पोकों दत्ता मोरे, पोकॉ सुधाकर माने, पोकों/पंकज घाडगे, पोकों शैलेश स्वामी, पोकों महेंद्र फुलारी, पोकों बाबुराव क्षिरसागर, पोह / अयाज बागलकोटे, पोह/प्रकाश गायकवाड, पोकों/अर्जुन गायकवाड, पोकों / सैफअली मुजावर यांनी पार पाडली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपल्या गहाळ मोबाईलचा शोध होण्यासाठी ceir.gov.in या वेबसाईडवर जावून माहिती भरुन सहकार्य करावे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.