Type Here to Get Search Results !

बोगस डॉक्टर सुसाट तालुका आरोग्य अधिकारी मोकाट कारवाई बाबत उपसंचालक भगवान पवार यांचे कमालीचे मौन यशवंत पवार करणार आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार



सोलापूर  (प्रतिनिधी ) शहरा लगत असलेल्या कुंभारी हद्दीतील नवीन विडी घरकुल येथे रुग्णाच्या जीवाशी खेळणारे अनेक बोगस  डॉक्टर असून कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना देखील नवीन विडी घरकुल परिसरात अनेक ठिकाणी वैद्यकीय ज्ञान नसलेले बोगस डॉक्टर बिनदीक्कीत पणे रुग्णावर उपचार करत असून या बोगस डॉक्टरमुळे नवीन विडीघरकुल मधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून चुकीच्या उपचारामुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.


त्यामुळे अश्या बोगस डॉक्टरांचा वेळीच शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज होती.नवीन विडी घरकुल भागातील कामगारांना व गोरगरीबांना तज्ज्ञ डॉक्टरची फी परवडत नाही तसेच बोगस डॉक्टरांची वैद्यकीय उपचारा फी कमी असल्याने रुग्ण उपचारासाठी या बोगस डॉक्टरकडे जातात हा डॉक्टर बोगस असल्याचे रुग्णाला देखील कळत शिवाय रुग्ण देखील अश्या बोगस डॉक्टरांच्याच्या वैद्यकीय शिक्षणा बाबत अधिक चौकशी करत नाहीत त्यामुळे वर्षानुवर्षे नवीन विडी घरकुल परिसरात बोगस डॉक्टर उघडपणे व्यवसाय करत आहेत नवीन विडी घरकुल परिसरात बोगस डॉक्टरांची डोकेदुखी अनेक वर्षांपासून सुरु असून बोगस डॉक्टरमुक्त करण्यासाठी  तालुका आरोग्य अधिकारी यांनी यांनी प्रयत्न करावेत म्हणून जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी दिनांक ११/८/२०२५ रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच तालुका आरोग्य आरोग्य दक्षिण सोलापूर यांना लेखी पत्र दिले होते. वैद्यकीय परवाना व डिग्री नसलेल्या बोगस डॉक्टरवर कायदेशीर करण्यासाठी जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी दिनांक ४ ऑगस्ट २०२५ पासून पूनम गेट जिल्हा परिषद समोर सोलापूर येथे फलक लावून बेमुदत धरणे आंदोलन देखील केले होते तब्बल २२ दिवसांनी तालुका आरोग्य अधिकारी  यांना जाग आली होती त्यांनी  दिनांक २६/८/२०२५ रोजी नवीन विडी घरकुल परिसरातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करतो म्हणून जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांना लेखी पत्र देऊन बेमुदत धरणे आंदोलन पाठीमागे घेण्याबाबत विनंती केली होती परंतु आजतागायत नवीन विडी घरकुल परिसरातील कोणत्याही बोगस डॉक्टरवर अद्याप कारवाई नसल्याने बोगस डॉक्टरांना तालुका आरोग्य अधिकारी हेच पाठीशी घालत असल्याचा आरोप करत जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी उपसंचालक भगवान पवार आरोग्य सेवा पुणे यांच्याकडे आरोग्य अधिकारी विरोधात कारवाई करावी म्हणून दिनांक 12/9/2025 रोजी पुणे येथे तक्रार केली होती  परंतु अद्याप उपसंचालक  भगवान पवार आरोग्य सेवा पुणे परिमंडळ यांनी तालुका आरोग्य अधिकारी विरोधात कोणतीही कारवाई केलेली नसून कारवाई बाबत कमालीची चुप्पी साधत हाताची घडी तोंडावर बोट ठेऊन उपसंचालक पदाची खुर्ची उबवणाऱ्या भगवान पवार यांना आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई साठी मुहूर्त हवाय का? असा सवाल जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी उपस्थित करून आता थेट महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे तालुका आरोग्य अधिकारी व उपसंचालक पुणे मंडळ भगवान पवार  यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी तक्रार दाखल  करणार असल्याची माहिती दिली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.