सोलापूर (प्रतिनिधी ) जन सामान्य माणसांचा बुलंद आवाज म्हणून गेल्या दहा वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समितीचे मुखपत्र असलेल्या साप्ताहिक कार्यसम्राट च्या दिवाळी विशेष अंकाचे प्रकाशन सोलापूर चे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या हस्ते पोलीस आयुक्त कार्यालयात करण्यात आले संपादक यशवंत पवार हे अनेक वर्षांपासून पत्रकारिता करत असून वृत्त पत्र चळवळ जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी आपलं उभं आयुष्य पणाला लावलं आहे निरपेक्ष निर्भीड अन सडेतोड बातमीमुळे साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राने जन सामान्य माणसात वेगळीच विश्वासहर्ता निर्माण केल्याचे प्रतिपादन सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे विभाग) राजन माने यांनी साप्ताहिक कार्यसम्राट च्या दिवाळी अंक प्रकाशन वेळी केलं असून समाजातील वंचित पिढीत घटकांच्या न्याय हक्कासाठी साप्ताहिक कार्यसम्राटने आग्रही भूमिका बजावून त्यांचे प्रश्न सोडवावेत अशी अपेक्षा व्यक्त करून संपादक यशवंत पवार यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत ते पुढे म्हणाले की
महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यात यशवंत पवार यांची भूमिका अतिशय मोलाची ठरली असून पत्रकारांचे दुःख व्यथा अडचणी जाणून घेऊन आंदोलन उपोषण निवेदन च्या माध्यमातून यशवंत पवार यांनी पत्रकारांचे प्रश्न सोडवले आहेत त्यांनी सुरु केलेल्या साप्ताहिक कार्यसम्राट वृत्त पत्राने समाजात आगळी वेगळी विश्वासहर्ता निर्माण केली असल्याचे मत सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांनी व्यक्त केलं आहे यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष तथा साप्ताहिक कार्यसम्राट चे संपादक यशवंत पवार शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी सचिव अरुण सिडगिद्दी दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद महाराष्ट्र पोलीस वार्ता चे संपादक अमोल कुलकर्णी हल्लाबोल न्यूज चे शब्बीर शेख आदिल पटेल आबीद तांबोळी उपस्थित होते.
