सोलापूर (प्रतिनिधी ) जन सामान्य माणसांचा बुलंद आवाज म्हणून गेल्या दहा वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समितीचे मुखपत्र असलेल्या साप्ताहिक कार्यसम्राट च्या दिवाळी विशेष अंकाचे प्रकाशन फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत (साहेब ) यांच्या
हस्ते करण्यात आले जेष्ठ पत्रकार यशवंत पवार हे अनेक वर्षांपासून पत्रकारिता करत असून वृत्त पत्रचळवळ जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी आपली हयात घालवली असून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यात त्यांची भूमिका अतिशय मोलाची ठरली असून पत्रकारांचे दुःख व्यथा अडचणी जाणून घेऊन आंदोलन उपोषण निवेदन च्या माध्यमातून यशवंत पवार यांनी पत्रकारांचे प्रश्न सोडवले आहेत वृत्तपत्रे हे समाजाचे कान व डोळे असून समाजातील घडणाऱ्या चांगल्या वाईट घटना पत्रकार आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजासमोर आणत असतो आपल्या लोकशाहीत वृत्तपत्रानां मानाचे स्थान असून पत्रकारिता टिकली तरच खऱ्या अर्थाने लोकशाही टिकेल असं परखड मत फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री महादेव राऊत यांनी साप्ताहिक कार्यसम्राट च्या दिवाळी अंक प्रकाशन वेळी व्यक्त करून साप्ताहिक कार्यसम्राट च्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी साप्ताहिक कार्यसम्राट चे संपादक तथा जेष्ठ पत्रकार यशवंत पवार दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद जेष्ठ पत्रकार अरुण सिडगिद्दी महाराष्ट्र पोलीस वार्ता चे संपादक अमोल कुलकर्णी उपस्थित होते.
