Type Here to Get Search Results !

वळसंग पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे रुजू




सोलापूर (प्रतिनिधी ) वळसंग पोलीस स्टेशनच्या प्रमुख अधिकारी म्हणून एपीआय राहुल डोंगरे यांची निवड झाली असून त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारून कामाला सुरुवात केली आहे. 


वळसंग पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी एपीआय अनिल सनगले यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात बदली झाल्याने त्यांच्या जागी राहुल डोंगरे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. 2012 मध्ये पीएसआय म्हणून पोलीस सेवेत रुजू झालेले राहुल डोंगरे यांनी रायगड येथे सेवा बजावली आहे. त्यानंतर पदोन्नतीवर त्यांची नागपूर शहर गुन्हे शाखेत बदली झाली. 2023 पासून सोलापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात त्यांनी कामगिरी केली आहे. आता त्यांची वळसंग पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.


ग्रामीण आणि शहर हद्द असलेल्या वळसंग पोलीस स्टेशनची कामगिरी आतापर्यंत महत्त्वाची राहिली आहे. शांततापूर्ण वातावरण व भागात सुव्यवस्था ठेवण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपण चांगले काम करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.