सोलापूर (प्रतिनिधी ) शहरातील सराईत गुन्हेगार सुरज ऊर्फ नागेश शिवाजी महानुर (वय ३४, रा. घ.नं. १५२, सळई मारुती जवळ, उत्तर कसबा, सोलापूर) याला पोलिसांनी एमपीडीए अधिनियम, १९८१ अंतर्गत स्थानबद्ध केले आहे. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर यांनी दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी स्थानबद्धतेचा आदेश निर्गमित केला होता. त्यानुसार दि. २९ सप्टेंबर २०२५ रोजी महानुर यास अटक करून पुणे येथील येरवडा कारागृहात दाखल करण्यात आले.
सुरज ऊर्फ नागेश महानुर हा मागील अनेक वर्षांपासून घातक शस्त्राने दहशत माजवणे, जबरी चोरी करणे, खंडणी मागणे, गैरनिरोध करणे, दगडफेक करणे, अवैध मंडळी जमविणे, धाकदपटशा करणे यांसारखे गंभीर गुन्हेगारी कृत्य करीत होता. त्याच्याविरोधात सोलापूर शहरात एकूण ०६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या या गुन्हेगारी कारवायांमुळे सोलापूरातील व्यापारी व सामान्य नागरिक भयभीत झाले होते. त्याच्याविरोधात उघडपणे माहिती देण्यास लोक धजावत नव्हते.
यापूर्वीही त्याच्याविरुद्ध अनेक वेळा कारवाई करण्यात आली होती.
सन २०१३ मध्ये क.१०७ फौ.प्र.सं अधिनियमानुसार कारवाई
सन २०१४ मध्ये क.५६ (१)(अ)(ब) महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत कारवाई
सन २०१७ व २०२४ मध्ये एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धता
तरीसुद्धा त्याच्या वर्तनामध्ये बदल न झाल्याने, सार्वजनिक सुव्यवस्थेच्या दृष्टीने पुन्हा एकदा एमपीडीए कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई एम. राज कुमार, पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत डॉ. अश्विनी पाटील, पोलीस उपआयुक्त (गुन्हे/विशा) विजय कबाडे, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ), राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), प्रताप पोमण, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-०१ अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे), महादेव राऊत, वपोनि, फौजदार चावडी पोलीस ठाणे, सपोनि तुकाराम घाडगे, गुन्हे शाखा, तसेच एमपीडीए पथकातील अंमलदार पोहेकॉ विनायक संगमवार, पोहेकॉ सुदीप शिंदे, पोशि अक्षय जाधव, पोशि विशाल नवले यांनी विशेष भूमिका बजावली.
