Type Here to Get Search Results !

ऑर्केस्ट्रा बारमधील गायिकेच्या घरात चोरी अवघ्या 12 तासात दोन संशयित जेरबंद, फौंजदार चावडी पोलिसांची दमदार कामगिरी इतर चोरीचा तपास कधी ?




सोलापूर,(प्रतिनिधी)  बाळे परिसरातील

एका ऑर्केस्ट्रा बारमध्ये गायिका म्हणून काम करणाऱ्या माही कौर यांच्या घरातून चोरट्याने दोन लाख ४५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल होताच पोलिसांनी १२ तासांत दोन संशयित चोरट्यांना जेरबंद केले आहे.


फिर्यादी माही या २२ सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास बाळे परिसरातील सुरवसे नगरातील त्यांच्या घराला कुलूप लावून ऑर्केस्ट्रा बारमधील कामासाठी गेल्या. त्याच रात्री चोरी झाली. गुन्हा दाखल होताच फौजदार चावडी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची पडताळणी केली. चोरटे कॅमेऱ्यात कैद झाले होते. पोलिसांनी त्यांचा शोध घेतला आणि अटक केली. दोन्ही संशयित रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सहायक पोलिस निरीक्षक क्षीरसागर तपास करीत आहेत. ऑर्केस्ट्रा बार मधील  गायिकेच्या घरातील झालेल्या चोरीचा अवघ्या 12 तासात तपास लागतो सशयित देखील जेरबंद केले जातात  परंतु फौंजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीत चोरीच्या अनेक घटना घडल्या असून त्या चोरांचा पोलीस कधी  शोध घेणार ?असा प्रश्न चोरी झालेल्या नागरिकांना पडला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.