Type Here to Get Search Results !

सोलापुरात दोन तरुणांकडून 02 पिस्टल 10 जिवंत काडतूसे एक कार, तब्बल 10 लाखांचा ऐवज जप्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांची सिंघम स्टाईल कारवाई

 



सोलापूर (प्रतिनिधी ) मूळचा कर्नाटकातील रमेश विश्वनाथ धूळ याने देशी बनावटीच्या दोन गावठी पिस्टल आणून सोलापुरातील दोन तरुणांना पोच केल्या होत्या. त्यासोबत दहा गोळ्या (जिवंत काडतुसे) देखील होत्या. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने सचिन सिद्धाराम झगळघंटे (वय ३८, रा. कर्देहळ्ळी) व फरहान अखिल शेख (वय १९, रा. अमन चौक, नवीन विडी घरकूल) या दोघांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी ठोठावली आहे.


सोलापूर-अक्कलकोट रोडवरील एसएनएल टॉवर जवळील सर्व्हिस रोडवर एक पांढऱ्या रंगाची कार थांबली आहे. त्याठिकाणी एक दुचाकी देखील असून त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्टल असल्याचे खबर पोलिस हवालदार भारत पाटील यांना खबऱ्याकडून मिळाली होती

 त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय काळे यांच्या नेतृत्वातील पोलिस अंमलदार अनिल जाधव, महेश शिंदे, भारत पाटील, कुमार शेळके, राजू मुदगल, महेश पाटील, सिद्धाराम देशमुख या पथकाने त्याठिकाणी धाव घेतली. या पथकाने सापळा रचून तेथील सचिन झगळघंटे

 व फरहान शेख या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतल्यावर 02 पिस्टल बंदुका व 10 जिवंत काडतूसे पोलिसांना मिळाल्या.



याशिवाय गुन्ह्यात वापरलेली कार व दुचाकी देखील पोलिसांनी

 जप्त केली आहे. ही कारवाई पोलिस आयुक्त एम. राज कुमार, उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलिस आयुक्त राजन माने, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे अंमलदार अनिल जाधव महेश शिंदे भारत पाटील कुमार शेळके राजू मुदगल महेश पाटील सिद्धारम देशमूख सायबर पोलीस ठाणेकडील मछिंद्र राठोड यांनी पार पाडली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.