Type Here to Get Search Results !

सोलापूर गुन्हे शाखेची मोठी कामगिरी : ३ गुन्ह्यांचा उलगडा, ०१ ऑटरिक्षा ०१ मोटारसायकल व २३ मोबाईल हँडसेटसह तब्बल 3 लाखांचा मुद्देमाल जप्त




सोलापूर (प्रतिनिधी ) शहर गुन्हे शाखेने पुन्हा एकदा धडाकेबाज कामगिरी करत चोरीच्या ३ वेगवेगळ्या गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. या कारवाईतून चोरीस गेलेली ०१ ऑटोरिक्षा, ०१ मोटारसायकल आणि तब्बल २३ मोबाईल हँडसेट असा एकूण ३.०५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.


ही कारवाई शहराचे पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त (गुन्हे/विशा) डॉ. अश्विनी पाटील, साहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. विशेष म्हणजे, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने ही यशस्वी मोहिम राबवली


प्रकरण क्र. १ : चोरीची ऑटो व मोटारसायकल जप्त

दि. २३ सप्टेंबर रोजी पोलीस उपनिरीक्षक, मुकेश गायकवाड आणि त्यांचे तपास पथक पोलीस आयुक्तालय हद्दीत गस्त घालत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली. या माहितीनुसार सैफन नुरुद्दीन बागवान (वय ३०, रा. किसन नगर, चौगुले यांचे घराजवळ, सोलापूर) हा चोरीची ऑटो रिक्षा विक्रीस नेणार असल्याचे समजले. पोलिसांनी तत्काळ सापळा रचून कारवाई केली.


यावेळी पोलिसांनी बजाज कंपनीची लोहार ऑटो रिक्षा (क्र. MH-13 CT 5736), युनिकॉर्न कंपनीची मोटारसायकल व नंबर प्लेटसह एकूण १५,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. चौकशीतून जेलरोड व वळसंग पोलीस ठाण्यातील दोन गुन्हे उघडकीस आले.


प्रकरण क्र. २ : २३ मोबाईल हँडसेट हस्तगत


दि. २८ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा गस्तीदरम्यान गुन्हे शाखेला यश मिळाले. लखन तुकाराम बेरुंगी (वय ३८, रा. राहुल गांधी झोपडपट्टी, दाजीपेठ, सोलापूर) हा संशयित आढळला. पोलिसांनी त्याला अडवले असता त्याच्याकडे असलेल्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीतून २३ मोबाईल हँडसेट आढळले.


यामध्ये सॅमसंगसह विविध कंपन्यांचे स्मार्टफोन होते. त्यातील एका मोबाईलचा IMEI नंबर पडताळून पाहिला असता, तो जोडभावी पेठ पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातील मुद्देमाल असल्याचे निष्पन्न झाले. उर्वरित मोबाईल्सची माहिती घेऊन त्यांचे मूळ मालक शोधण्याचे काम सुरू आहे.



           पोलिसांचा गौरवशाली तपास


या कारवाईतून एकूण ३ गुन्हे उघडकीस आले असून, जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत रु. ३,०५,०००/- इतकी आहे.


ही कामगिरी गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. पथकात पोलीस नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंखे, अजिंक्य माने, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, चालक बाळू काळे आणि सतीश काटे यांचा समावेश होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.