Type Here to Get Search Results !

यंत्रमाग कामगारांना 8.33% टक्के बोनस देण्यात यावे.. सहाय्यक कामगार आयुक्तांच्या सूचना.

 



 सोलापूर (प्रतिनिधी) 

           यंत्रमाग उद्योगातील सर्व कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस देण्यात यावा., अशी मागणी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली. त्याचबरोबर सिटू कामगार संघटनेकडूनही यंत्रमाग कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस देण्यात यावा., अशी मागणी करण्यात आली. त्या आधारे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात झालेल्या संयुक्त बैठकीत यंत्रमाग उद्योगातील सर्व कामगारांना कायद्यानुसार 8.33% बोनस देण्यात यावे., अशी सूचना सहाय्यक कामगार आयुक्त श्री यलगुंडे यांनी केल्याची माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

           यंत्रमाग उद्योगातील सर्व कामगारांना दिवाळीपूर्वी 10% टक्के बोनस देण्यात यावे., अशी मागणी महाराष्ट्र कामगार सेनेने केली. त्याचबरोबर सिटू कामगार संघटनेने 15 % बोनस देण्यात यावा., अशी मागणी केली होती. त्यानुसार बोनस बाबतीत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात दिनांक 13 ऑक्टोबर 2025 रोजी सहाय्यक कामगार आयुक्त यांनी यंत्रमाग धारक संघ व यंत्रमाग कामगार संघटना यांची संयुक्त बैठक बोलावली या बैठकीत कामगार संघटनांनी दिवाळीपूर्वी बोनस देण्याची मागणी केली., त्यास यंत्रमाग धारक संघांनी प्रचलित पद्धतीने बोनस देण्यात येईल अशी आपली बाजू मांडली. त्यास कामगार संघटनेने विरोध दर्शवून दिवाळीपूर्वीच 10% टक्के बोनस कामगार सेना तर सिटू संघटना 12% टक्के बोनसची मागणी केली. दोन्हीकडची बाजू ऐकून सहाय्यक कामगार आयुक्त श्री निलेश येलगुंडे यांनी कायद्यानुसार 8.33% बोनस देण्याची सूचना केली.

      सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यंत्रमाग धारक संघाचे पेंटप्पा गड्डम, नारायण आडकी, सिटू संघटनेचे व्यंकटेश कोंगारी, मेहता, शेख, तर महाराष्ट्र कामगार सेनेचे विष्णू कारमपुरी (महाराज), सोहेल शेख, श्रीनिवास बोगा, रेखा आडकी, गुरुनाथ कोळी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.