Type Here to Get Search Results !

PUC सक्ती अमान्य असून नागरिकांना जाचक आहे PUC सर्टिफिकेट सक्तीविरोधात शिवसेनेचा आवाज बुलंद करणार…अजय दासरी




सोलापूर (प्रतिनिधी ) शहरात प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) ची सक्ती अमान्य असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने स्पष्ट केले आहे. “प्रथम शहरातील रस्ते नीट करा, खड्डेमुक्त करा, टोल वसुली बंद करा मग PUC सक्तीबद्दल बोला,” अशी स्पष्ट भूमिका शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ. प्रा. अजय दासरी यांनी घेतली.


यासंदर्भात सोलापूरमधील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी सोलापुर आणि आरटीओ सोलापूर यांच्याकडे समक्ष भेटून भूमिका मांडली. 

या शिष्टमंडळात  जिल्हा प्रमुख प्रा डॉ अजय दासरी यांच्यासह प्रताप चव्हाण, स्वप्नील वाघमारे, शशिकांत बिराजदार, नाना मोरे, सुधीर संगेपाग, दत्ता रुचनभैरे, सिद्राम चोपडे, वाडेकर, अजय खांडेकर, रवी म्हेत्रे नायक आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.


शहरातील जनतेवर अन्यायकारक नियम लादण्याऐवजी रस्त्यांची दुरुस्ती, खड्डेमुक्ती, व टोलमाफीसारखे तातडीचे प्रश्न सोडवावेत, अन्यथा तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.