Type Here to Get Search Results !

दुचाकी चोरणाऱ्या अल्पवयीनसह दोघेजण ताब्यात, ८ गाड्या जप्त, जेलरोड पोलीसांची दमदार कारवाई




सोलापूर (प्रतिनिधी ) चोरीच्या दुचाकीची विक्री करण्यासाठी आलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकासह दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चोरीच्या ३ लाख ३० वा हजार रुपये किमतीच्या ८ दुचाकी जप्त केल्या. या कारवाईत दुचाकी चोरीचे ८ गुन्हे उघडकीस आणले.


अक्कलकोट रोडवरील शांती चौकातील हिंदु स्मशानभूमी येथे ही कारवाई करण्यात आली. एजाज अहमद युसूफ बागवान (रा. विजापूर वेस, शुक्रवार पेठ, सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. जेलरोड पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी बालकाला ताब्यात घेऊन दुचाकीबाबत चौकशी केली असता ती दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून चोरीच्या आणखी ५ दुचाकी मिळून आल्या. अशाप्रकारे पोलिसांनी त्या बालकांकडून जेलरोड पोलिस ठाण्यात दाखल असलेले दुचाकी चोरीचे ६ गुन्हे उघडकीस आणले. तसेच पोलिसांनी एंजाज बागवान याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी जप्त केल्या. यामुळे एमआयडीसी व मंगळवेढा पोलिस ठाण्यात दाखल असलेला दुचाकी चोरीचा गुन्हे उघडकीस आले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी विधीसंघर्षग्रस्त बालकाचा शोध घेवून वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी राऊत पोलीस निरीक्षण भाऊराव बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक फौजदार एच डी नदाफ, पोलिस हवालदार धनाजी बाबर, संतोष वायदंडे भारत गायकवाड साईनाथ यसल वाड उमेश सावंत युवराज गायकवाड कल्लपा देकाणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.