सोलापूर (प्रतिनिधी ) शहराची लोकसंख्या ११ लाखांवर असतानादेखील शहरात अवधी सात पोलिस ठाणी आहेत. शहराचा विस्तार वाढल्याने अडचणीतील लोकांना पोलिसांची मदत घ्यायला वेळेत पोचता येत नाही. अशावेळी त्या लोकांना 'डायल ११२' या टोल फ्री क्रमांकावर एक कॉल करून मदत घेता येते. पूर्वी यावरून मदत मिळायला सात मिनिटे लागत होती, आता अवघ्या पाच मिनिटे ५० सेकंदात पोलिसांची मदत मिळते.
मुंबई, ठाणे, पुणे अशा मोठ्या शहरांमध्ये रात्री-अपरात्री प्रवास करताना महिला, तरुणींना अडचण आल्यास
त्यांना डायल ११२ वरून पोलिसांची मदत होते. सोलापूर शहरात असा प्रसंग कधी घडला नाही, पण घरगुती भांडण , शेजारच्यांची मारहाण, पती पत्नी, सासू-सून यांच्यातील भांडण, यासंदर्भात पोलिसांच्या कंट्रोल रूम कडे कॉल येतात तक्रारींचे स्वरूप किरकोळ असल्याने एक किंवा दोन पोलिस अंमलदार जातात. अनेकदा भांडण करणारा
त्यांनाही आवरत नाही, त्यावेळी आणखी अंमलदार बोलावून घेतले जातात. सध्या शहरातील
सात पोलिस ठाण्याअंतर्गत प्रत्येकी चार गाड्या आहेत. त्यात दोन बीट मार्शल व दोन अंमलदार अशी टीम असते. पोलिसांकडून ही सेवा २४ तास दिली जाते. डायल ११२ वरून
अडचणीतील लोकांना मदत करायला धावणाऱ्या पोलिस अंमलदारांचे प्रशिक्षण घेण्यात आले असून मदतीचा वेळ देखील पूर्वी पेक्षा एक मिनीट १० सेकंदाने कमी झाला. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांनी दिली आहे.
