सोलापूर (प्रतिनिधी ) जिल्ह्यातील विविध गावातून तरुण नवरात्रोत्सवात ज्योत आणायला तुळजापुरातील तुळजाभवानी मातेच्या मंदिरात जातात. त्यावेळी दुचाकीस्वार सायलेन्सरच्या पुंगळ्या काढतात. अशा दुचाकीस्वारांवर आता वाहतूक पोलिस कारवाई करणार आहेत. त्यांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा दंड असणार आहे.
नवरात्रोत्सवात ज्योत आणायला दरवर्षी गावागावांतून हजारो भाविक तुळजापूरला जातात. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली जाते. दरवर्षी बेशिस्त दुचाकीस्वारांमुळे अपघात होतात. त्यात काहींना जीव देखील गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर या मार्गावर वाहतूक पोलिस नेमले जाणार आहेत. सोलापूर शहरात बाईक रॅलीला परवानगी नसल्याने कोणीही एकत्रित येऊन बाईक रॅली काढून नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. पालकांनी आपल्या मुलांना मोबाईल
आणि दुचाकीपासून दूर ठेवावे, जेणेकरून कायद्याचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार नाहीत. गुन्हा दाखल झाल्यावर पुन्हा त्यांचे करिअर बरबाद होऊ शकते, असा सल्ला पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी दिला आहे.
१९३ मंडळांकडून देवीची प्रतिष्ठापना
शहरात नऊ मध्यवर्ती नवरात्रोत्सव मंडळे असून त्या अंतर्गत 193 मंडळाचा
समावेश आहे.त्यांच्या कडून
यंदा देवीची मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे दरम्यान, नवरात्रोत्सवात कुटुंबा दर्शनासाठी बाहेर पडणाऱ्या भाविकांची संख्या रात्री च्या वेळी मोठी असते . या पार्श्वभूमीवर शहरात पोलिस गस्त वाढविली जाणार आहे. विनाकारण रात्री दहानंतर रस्त्यावर फिरणाऱ्या किंवा टवाळखोरी करणाऱ्यावर देखील पोलीस कारवाई करणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिली आहे.
