Type Here to Get Search Results !

कायद्याच्या रक्षकांची कायद्याच्या अभ्यासकाला मारहाण ? विजापूर नाका पोलीस ठाण्यातील प्रकार, पोलिसांवरील आरोप चुकीचे दादासाहेब गायकवाड यांची माहिती



सोलापूर (प्रतिनिधी ) रस्त्यावर उभी केलेली संशयित दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेतली. त्यानंतर गाडी घेण्यासाठी पोलिस ठाण्यात आलेल्या वकिलास मारहाण झाली. यात वकिलाच्या हाताच्या अंगठ्याला जखम झाली असून, ते सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.


हा प्रकार विजापूर नाका पोलिस ठाण्याच्या परिसरात शुक्रवारी (ता. १९) घडला. सागर श्रीकांत मंद्रूपकर (वय ३२, रा. समर्थ सोसायटी, एसआरपी कॅम्प, सोलापूर) असे मारहाण झालेल्या वकिलाचे नाव आहे.


मारहाणीत जखमी अॅड. मंद्रूपकर हे गुरुवारी कामानिमित्त पुण्याला गेले होते. शुक्रवारी पहाटे साडेतीनच्या


सुमारास ते सोलापुरात आले. त्यादरम्यान त्यांना घेण्यासाठी मित्राला बोलावले होते. परंतु, मोपेड वाहन वाटेतच बंद पडले. ती सुरू झाली नसल्याने त्यांच्या मित्राने एसआरपी कॅम्पसमोरील रस्त्यावर दुचाकी उभी केली आणि दुसरी दुचाकी घेऊन ते वकिलांना घेण्यासाठी गेले. तेथून घराकडे जाताना त्यांना दुचाकी त्या ठिकाणी दिसली नाही. त्यांनी


आजूबाजूला शोध घेतला, परंतु दुचाकी आढळली नाही. त्यावेळी सकाळी पोलिसांत तक्रार देऊ म्हणून ते घरी गेले. सकाळी पोलिस ठाण्यात गेल्यानंतर त्यांना त्यांची दुचाकी तेथे दिसली. पोलिसांनी ते वाहन संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. पोलिसांनी दुचाकीची डिक्की उघडी ठेवली होती, त्यात दोन मोबाईल व इतर वस्तू मिळाल्याचे सांगितले. 


त्यावर त्यांच्यात चर्चा झाली. दरम्यान वकिलांना बाहेर बसण्यास सांगण्यात आले. त्यावेळी तेथे आलेले अधिकाऱ्यांशी बोलताना वकील मित्राला काहीतरी बोलले. त्या पोलिसांचा गैरसमज झाला वकील आपल्यालाच उद्देशून अशा गैरसमजातून चार-पाच जणांनी त्यांना मारहाण केली, असे मंद्रूपकर यांनी सांगितले.या बाबत त्यांनी सोलापूर बार असोसिएशन ना माहिती दिली आणि बार चे पदाधिकारी व सदस्यांनी रुग्णालयात त्यांची भेट घेतली.

*पोलिसांवर केलेले आरोप चुकीचे अन बिनबुडाचे*

गुरुवारी मध्यरात्री संशयित दुचाकी पोलीसांनी ताब्यात घेतली होती त्यावरून वकिलाने पोलीस ठाण्यात येऊन गोंधळ घातला त्यामुळे त्या वकीलवर प्रति बंधात्मक कारवाई करण्यात आल्याने ते वकील पोलिसांवर चुकीचे आरोप करत आहेत.

           दादासाहेब गायकवाड

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजापूर नाका पोलीस ठाणे सोलापूर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.