Type Here to Get Search Results !

डीजेमुक्त मंडळांचा पोलिस आयुक्तांकडून सन्मान




सोलापूर (प्रतिनिधी ) शहरात पहिल्यांदाच डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा झाला. डीजेमुक्त कृती समितीने त्यासाठी पुढाकार घेतला होता. त्याला सर्व गणेशोत्सव मंडळांनी साथ दिली आणि पोलिसांच्या आवाहनानुसार डीजेमुक्त मिरवणुका काढल्या. त्याबद्दल पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांनी दहा मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला.


पोलिस आयुक्तालयातील शांतता कमिटीच्या बैठकीत पोलिस आयुक्तांनी सोलापूर शहरातील गणेशोत्सव डीजेमुक्त करणाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी टिळक चौकातील वीरबाल तरुण मंडळ,


दमाणी नगरातील गवळी वस्ती तालिम संघ गणेशोत्सव मंडळ, लष्करमधील सिंहगर्जना तरुण मंडळ, माशाळ 

वस्तीतील पंचमुखी गणेश कला व क्रीडा मंडळ, विशाल नगरातील विशाल नगर गणेशोत्सव मंडळ, साखर पेठेतील




श्री गणेश बाल तरुण मंडळ, निलम नगरातील श्री गणेश संकल्प सिद्धमित्र मंडळ, विडी घरकूलमधील सुवर्णयुग मित्र मंडळ, पुलगम टेक्स्टाईलचे श्री आप्पा गणपती आणि थोबडे नगरातील श्री आपला गणपती प्रतिष्ठान मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच मंडळांची निवड करणाऱ्या परीक्षकांचाही पोलिस आयुक्त एम. राज कुमार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नवरात्र उत्सव मंडळांचे पदाधिकारी, पोलिस उपायुक्त विजय कबाडे, डॉ. अश्विनी पाटील, गौहर हसन, सहायक पोलिस आयुक्त प्रताप पोमण राजन माने, सुधीर खिरडकर यांच्यासह सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.