Type Here to Get Search Results !

आर टी ओ कार्यालयातील झिरो कर्मचाऱ्यांना बाहेर करण्यासाठी पत्रकार अमोल कुलकर्णी यांचे सोमवार पासून बेमुदत आंदोलन.




सोलापूर ( प्रतिनिधी ) येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय असून दुचाकी चारचाकी  रिक्षा टॅक्टर  बरोबर इतर वाहनांना कच्चे लायसन्स पक्के लायसन्स   वाहनाचे रजिस्ट्रेशन नवीन नंबर देणे रिक्षाचे परमिट वाहने नावावर करून देणे त्याचबरोबर वाहने पासिंग करून देणे यासह वाहनाच्या विविध शासकीय नोंदी संदर्भात सोलापूर शहरात प्रादेशिक परिवहन कार्यालय असून या कार्यालयाचे कार्यक्षेत्र देखील मोठे आहे या कार्यालयात विविध विभागात झिरो कर्मचारी कार्यरत असून हे झिरो कर्मचारी शासकीय कागदपत्रे दप्तरे हाताळणे वेगवेगळ्या वाहनांची नोंदी करणे त्याचबरोबर वाहना  संदर्भातील  सर्व प्रकारचे कामकाज करत असून सदरील झिरो कर्मचारी हे बेकायदेशीर असून अशा झिरो कर्मचाऱ्यांना प्रादेशिक परिवहन कार्यालयाने अभय दिले असून गेली कित्येक वर्षापासून हे झिरो कर्मचारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा कारभार पाहत  आहेत झिरो कर्मचाऱ्यांमध्ये  राजू धामणेकर  तेजस पुदाले व मयूर सावंत यांचा समावेश असून या झिरो कर्मचाऱ्यांची शासकीय कार्यालयातून हकालपट्टी करणेबाबत  पत्रकार अमोल कुलकर्णी यांनी यापूर्वी दिनांक 9/9/2025 रोजी सोलापूर चे जिल्हाधिकारी त्याचबरोबर प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरूपाची तक्रार केली होती परंतु अद्याप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील झिरो कर्मचाऱ्यांना कार्यालयाच्या बाहेर करण्यात आलेले नसल्याने अखेर प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथील झिरो कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करणे बाबत पत्रकार अमोल कुलकर्णी हे सोमवारपासून  जिल्हाधिकारी कार्यालय समोर बेमुदत  धरणे आंदोलन  करणार असल्याची माहिती दिली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.