Type Here to Get Search Results !

सोलापूर शहरात कलम ३७ (१) अन्वये पोलीस उपायुक्त डॉ.अश्विनी पाटील यांचा मनाई आदेश लागू.




सोलापूर (प्रतिनिधी ) सोलापूर शहर (पोलीस आयुक्तालय हद्दीत) शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१) (अ ते फ) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. हे आदेश दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी ००.०१ वाजल्यापासून ते २६ सप्टेंबर २०२५ रोजी मध्यरात्री २४.०० वाजेपर्यंत प्रभावी राहतील, अशी माहिती पोलीस उपायुक्त (गुन्हे/विशा) डॉ. आश्विनी पाटील यांनी दिली आहे.

या आदेशानुसार खालील गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे मिरवणुका काढणे, सभा घेणे, पाच किंवा अधिक व्यक्तींचा जमाव एकत्र करणे शस्त्रे, सोटे, तलवारी, सुरे, झेंडा लावलेली काठी किंवा इजा करण्यास वापरता येणाऱ्या वस्तू बरोबर नेणे ज्वालाग्राही व स्फोटक पदार्थ वाहून नेणे दगड, फेकावयाची उपकरणे, प्रतिमा किंवा प्रेतयात्रांचे प्रदर्शन सार्वजनिक घोषणा, असभ्य हावभाव, ग्राम्य भाषा वापरणे  जाती-धर्माच्या भावना दुखावणारे सोंगे, चिन्हे किंवा साहित्य प्रसारित करणे

या आदेशाचा अपवाद अत्यावश्यक सेवा व अधिकृत कर्तव्य बजावत असलेल्या सरकारी अधिकारी/कर्मचाऱ्यांना लागू होणार नाही. तसेच, जिल्हादंडाधिकारी, पोलीस अधीक्षक (ग्रा.), उपविभागीय दंडाधिकारी, पोलीस अधिकारी यांनी दिलेल्या परवानगीनुसार कार्य करणाऱ्या व्यक्तींनाही या आदेशातून सूट देण्यात आली आहे.

पोलीस प्रशासनाने नागरिकांना शांतता व कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.