सोलापूर (प्रतिनिधी ) पत्रकारिता एक वसा चळवळ ध्यास समजून गेल्या अनेक वर्षापासून गोदू ताई संदेश चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार अरुण सिदगीड्डी यांनी समाजातील वंचित पीडित घटकाच्या न्यायहक्कासाठी नेहमीच प्रशासन दरबारात आपल्या लेखणीच्या माध्यमातून निरपेक्ष निर्भीड व सडेतोड लेखन करत अन्यायग्रस्त अत्याचारग्रस्त लोकांना न्याय देण्याची भूमिका पार पाडली असून सध्या ते साप्ताहिक कार्यसम्राटचे ज्येष्ठ पत्रकार म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत पत्रकार आणि पत्रकारिता कशी असावी याबाबत ज्येष्ठ पत्रकार अरुण सिडगिद्दी यांनी अनेक पत्रकारांना मार्गदर्शन केले असून ज्येष्ठ पत्रकार अरुण सिडगिद्दी यांनी सोलापूर शहरात अनेक पत्रकार घडवले आहेत अरुण यांची नुकतीच भारत न्यूज एक्सप्रेस 9 च्या संपादक पदी निवड झाल्याने पत्रकार सुरक्षा समिती वतीने शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार कार्यकारी प्रदेश अध्यक्ष रामचंद्र सरवदे मराठवाडा विभाग कार्याध्यक्ष प्रवीण राठोड पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गणेश कारंडे सोलापूर जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे उपाध्यक्ष अमर पवार सरचिटणीस बंडू तोडकर सचिव अंबादास गज्जम पंढरपूर तालुका अध्यक्ष प्रकाश इंगोले पंढरपूर शहराध्यक्ष लखन साळुंखे सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी कार्याध्यक्ष राजू वग्गू समन्वयक लक्ष्मण सुरवसे संघटक कबीर तांडुरे कार्यकारी शहराध्यक्ष वाशिम राजा बागवान दैनिक लोकशाही मतदारचे संपादक अक्षय बबलाद अमोल कुलकर्णी इम्तियाज अक्कलकोटकर चैतन्य उत्पात रवींद्र शेवडे यासह अन्य पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
0 Comments