सोलापूर (प्रतिनिधी)
भारतीय संस्कृतीतील सर्वाधिक लोकप्रिय उत्सवांपैकी एक असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने सारा न्यूज नेटवर्कचे संपादक राम हुंडारे यांच्या स्वगृही गणपती बाप्पा विराजमान झाले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पाच दिवसांचा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
गणेश विसर्जनाच्या एक दिवस अगोदर आयोजित पूजाविधीला मान्यवरांची उपस्थिती लाभली. यामध्ये पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, तिसरी आँख मानवाधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व पत्रकार कृती समितीचे सर्वेसर्वा आप्पासाहेब लंगोटे, गुरववाडीचे विकासरत्न तथा माजी ग्रामपंचायत सदस्य म्हाळप्पा पुजारी, ज्येष्ठ पत्रकार व एम.डी. न्यूजचे संपादक सैपन शेख, दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद, हल्लाबोल न्यूज चे संपादक युनूस अत्तार, सिद्धेश्वर नगरी न्यूजचे गिरमल्ला गुरव, जनता संघर्ष न्यूज चे संपादक सिद्धार्थ भडकुंबे आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढविण्यात आले. त्यानंतर "इको नेचर क्लब" चे संस्थापक तथा पर्यावरण दूत डॉ. मनोज देवकर यांच्या हस्ते मान्यवरांचा पर्यावरणपूरक संदेश म्हणून रोप देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी गीता हुंडारे, प्रतिभा देवकर, रतना हुंडारे, सागर हुंडारे आदींची उपस्थिती लाभली. पाहुण्यांसाठी अल्पोपहाराचीही व्यवस्था करण्यात आली होती. भक्तिभाव, आनंद आणि उत्साहाने कार्यक्रम संपन्न झाला.
0 Comments