सोलापूर (प्रतिनिधी)
अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांचेकडे महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ५प अन्वये पंढरपूर तालुक्यात वाळु चोरी करणाऱ्या गुन्हेगारा टोळीस हद्दपार करणेबाबत प्रस्ताव पोलीस निरीक्षक, तय्यब मुजावर, पंढरपूर तालुका पोलीस ठाणे यांनी सादर केला होता, यातील टोळी प्रमुख व टोळी सदस्य यांचेवर पंढरपूर तालुका पोलीस ठाणे तसेच पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते.
टोळी प्रमुख १) पंकज पांडूरंग कोळेकर, रा. कोळेकर वस्ती, गुरसाळे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर, टोळी सदस्य २) हिंमत अनिल कोळेकर, रा. कोळेकर वस्ती, गुरसाळे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर, टोळी सदस्य ३) विनोद अर्जुन कोळेकर, रा. कोळेकर वस्ती, गुरसाळे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर, टोळी सदस्य ४) संतोष दगडू चव्हाण, रा. कोळेकर वस्ती, गुरसाळे, ता. पंढरपूर, जि. सोलापूर टोळी सदस्य ५) आकाश ऊर्फ अक्षय भगवान घाडगे, रा. देगाव, ता. पंढरपूर, जि. सोलापूर, टोळी सदस्य ६) धनाजी रामचंद्र शिरतोडे, रा. गुरसाळे, ता. पंढरपूर जि. सोलापूर, टोळी सदस्य ७) महेश दिगंबर शिंदे, रा. सहयाद्री नगर इसबावी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर, टोळी सदस्य ८) सोमनाथ अरुण लोंढे, रा. कोठाळी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर अशी टोळी आहे. त्यांनी पंढरपूर तालुक्यात अवैधरित्या वाळूतस्करीच्या अनुषंगाने शासकीय लोकसेवक यांना त्यांचे कामकाज करत असताना धाकाने परावृत्त करणे, खुनाचा प्रयत्न करणे, विना परवाना वाळू चोरी करणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे केले होते. टोळीने संघटीतरित्या एकत्र येवून तर कधी टोळीचा सदस्य म्हणुन स्वतंत्ररित्या गुन्हे करून सामाजीक स्वास्थ बिघडवत होते व टोळीची दहशत निर्माण करत होते. सदर प्रस्तावाची सुनावणी श्री. अतुल कुलकर्णी हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांचे समक्ष होवून टोळीस सोलापूर जिल्हयातुण ०१ वर्ष करीता हद्दपार करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील टोळी प्रमुख संतोष बंडु चव्हाण, व यशवंत बंडु चव्हाण दोघे रा. गुळवंची, ता. उत्तर सोलापूर यांच्या विरुध्द सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे अवैधरित्या हातभटटी दारू तयार करून त्याची विकी करणे, दारूची माहिती पोलीसांना दिली याचा संशय घेवून घातक हत्याराचा वापर करून इच्छापुर्वक दुखापत पोहोचवणे अशा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होते, त्यांचे विरूध्द पोलीस निरीक्षक. राहुल देशपांडे, सोलापूर तालुका पोलीस ठाणे यांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला होता. प्रकरणाची पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचेसमक्ष सुनावणी होवून त्यांना सोलापूर जिल्हयातून हद्दपार करण्यात आले आहे.
तरी याव्दारे नागरीकांना आवाहन करण्यात येते की, नमुद हद्दपार इसम हे त्यांना हद्दपार करण्यात आलेल्या क्षेत्रात वावरत असल्याचे आढळल्यास त्याबाबत ची माहिती तत्काळ संबधीत पोलीस ठाणेस व नियंत्रण कक्ष सोलापूर ग्रामीण येथे कळवावे. तसेच भविष्यात देखील दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणाऱ्या इसमा विरूध्द अभीलेख तयार करण्यात आले असुन त्यांचे विरूध्द प्रभावी प्रतिबंधक कार्वाई करण्यात येणार आहे.
0 Comments