सोलापूर (प्रतिनिधी ) गोरगरीब व गरजू लोकांना सवलतीच्या दरात जेवण मिळावे कोणीही गोरगरीब व गरजू उपाशी राहू नये म्हणून महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्यात शिवभोजन केंद्रे सुरू केले होते गोरगरीब गरजू व लोक कल्याणासाठी ही योजना राबविण्यात येत असून दोन चपाती एक वाटी डाळ एक वाटी तांदूळ असे जेवण गोरगरीब व गरजू लोकांना दिले जाते .
महाराष्ट्र राज्यातील शिवभोजन केंद्रांना शहरी भागात राज्यसरकार कडून अनुदान दिले जाते.
परिमंडळ कार्यालय क विभागातील काही शिवभोजन केंद्रात स्टीलची भांडी नसणे शिवभोजन केंद्रातील कर्मचाऱ्यांना हातमोजे टोपी नसणे स्वयंपाकासाठी फिल्टर पाणी नसणे वॉश बेसिन नसणे घरगुती गॅसचा वापर सीसीटीव्ही नसणे एकाच व्यक्तीचा अनेक वेळा फोटो काढणे त्याच बरोबर शिवभोजन थाळी पार्सल देणे तसेच शिवभोजन केंद्रात अन्न न शिजवणे असा प्रकार आढळून येत आहे काही शिवभोजन चालकांनी थाळी संख्या कागदोपत्री दाखवून राज्य सरकार कढून लाखों रुपयांची बोगस बिले लाटली आहेत अश्या अश्या शिवभोजन केंद्राची तपासणी करून त्यांचा परवाना रद्द करणे त्याच बरोबर शिव भोजन चालकावर फौंजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत परिमंडळ क विभागातील
बरेच शिवभोजन केंद्रे राज्य सरकार च्या मूळ उद्देशाला हरताळ फासणारी आहेत
परिमंडळ क विभागा तील शिवभोजन केंद्रात अनेक प्रकारचे दोष आहेत अशा शिवभोजन केंद्रामुळे राज्य सरकार ला लाखों रुपयांचा अनुदान पोटी चुना लागत आहे
राज्य सरकार ला अनुदानपोटी लाखों रुपयांना गंडवणाऱ्या शिवभोजन केंद्राची स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत तपासणी करून राज्य सरकार च्या तिजोरी वर डल्ला मारणाऱ्या व शिवभोजन केंद्र चालकांवर कारवाई करावी त्याच बरोबर
परिमंडळ कार्यालय क विभागातील सर्वच शिवभोजन केंद्राच्या तपासणी साठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करून दोषी असलेल्या शिवभोजन केंद्रावर कारवाई करावी तसेच त्यांना आजपर्यंत दिलेल्या अनुदानाची रक्कम वसुल करण्यात यावी अशी मागणी पत्रकार यशवंत पवार यांनी अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्या कडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

