सोलापूर (प्रतिनिधी ) गेल्या आठ वर्षांपासून पत्रकार सुरक्षा समिती प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांच्या नेतृत्वात पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर आक्रमक व प्रभावीपणे आंदोलन उपोषण निवेदन व राज्यसरकार कडे पत्र व्यवहार करून राज्यातील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत आहे यात प्रामुख्याने
ज्येष्ठ पत्रकार समान पेन्शन योजना राज्यातील साप्ताहिक वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती आधीस्वीकृतीपत्रिका मधील जाचक अटी रद्द करणे ग्रामीण भागातील पत्रकारांना एस टी बसमधून मोफत प्रवास पत्रकारांच्या चार चाकी वाहनाना टोल मधून सूट पत्रकारांसाठी घरकुल योजना विमा योजना आरोग्य योजना राज्यातील यूट्यूब व पोर्टलला शासकीय जाहिराती व मान्यता पत्रकारांवर होणारे हल्ले धमकी मारहाण त्याच बरोबर खंडणी सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या पत्रकारांची स्वतंत्र अधिकाऱ्यांमार्फत चौकशी या सह राज्यातील पत्रकारांच्या मूलभूत प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती अविरत पणे काम करत असून पत्रकारांच्या प्रश्नावर राजकीय उदासीनता दिसून येत असल्याने पत्रकार सुरक्षा समिती चे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर आता थेट गणराया ला साकडे घातले असून पत्रकारांचे प्रश्न सोडवण्याची सूबुद्धी विघ्नहर्त्या गणराया ने राज्यसरकार द्यावी अशी प्रार्थना देखील गणराया चरणी केली आहे.
0 Comments