सोलापूर (प्रतिनिधी ) जोगवा मागण्याच्या बहाण्याने महिलेला भीती दाखवून देवाच्या नावाने फसवुणक करुन ६५,०००/-रू रोख रक्कम घेवुन गेलेले दोन महिला आरोपीतांना ताब्यात घेवुन २४ तासाच्या आत फौंजदार चावडी पोलिसांनी गुन्हा उघड केला.
फिर्यादी यात सौ. स्नेहा प्रथमेश मंगळवेढेकर वय २२ वर्षे, व्यवसाय-गृहीणी रा. उत्तर कसबा, शेटेवाडा, बाळीवेस सोलापूर हे दि. २४/०९/२०२५ रोजी सकाळी ०९.३० चे सुमारास घरात असताना दोन महिला जोगवा मागण्याकरिता घरासमोर आल्या, त्या महिलांनी फिर्यादी यांना तुझ्या नवऱ्यावर संकट येणार आहे. तुझ्या नवऱ्याचा अपघात होणार आहे असे म्हणून भीती घालून तुझ्या नवऱ्यावर येणारे संकट व अपघात टाळण्यासाठी मी एक पुजा करते. तुझ्या नवऱ्याचे संकट दुर करते. घरात जेवढे पैसे असतील तेवढे आणुन माझ्या परडीत टाक असे सांगुन फिर्यादीचा विश्वास संपादन केला. त्यावेळी फिर्यादी यांनी घरात असलेले ६५,०००/- रु सदर महिलांच्या परडीत ठेवले, त्यावेळी त्या दोन्ही महिला देवी तुझ चांगल करेल तुझ भल होईल असे म्हणत पैसे घेवुन निघून गेल्या, अशा प्रमाणे प्राप्त तक्रारीवरुन फौजदार चावडी पोलीस ठाणे गु.र.नं. ६८१/२०२५ भा.न्या. संहिता २०२३ चे क ३१८(४),३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हा दाखल होताच गुन्ह्यांचे गांभीर्य लक्षात घेवुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी व दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि/क्षिरसागर यांना पथकासोबत सदर गुन्ह्यांतील आरोपीचा तात्काळ शोध घेण्याबाबत आदेश दिले. त्याप्रमाणे सपोनि संजय क्षिरसागर व त्यांचे पथकाने तात्काळ सदर आरोपीचा फौजदार चावडी पोलीस ठाणे हद्दीत शोध सुरु केला. गुप्त बातमीदार व सदर महिलांचे प्राप्त फोटो यावरुन सलग २४ तास तपास करत असता दरम्यान पोलीसांना दि. २५/०९/२०२५ रोजी सांयकाळच्या सुमारास गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, फिर्यादी यांची फसवणुक करणाऱ्या दोन महिला या सावरकर मैदान येथे फिरत आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली. त्याअनुषंगाने सदर बातमीची योग्य ती शहानिशा करुन सदर ठिकाणी जावून पोलीसांनी सापळा लावून शोध घेतला असता सदर दोन महिला सावरकर मैदानकडे पायी चालत येत असतना दिसल्या त्या पोलीसांना पाहुन पळून जाण्याचा प्रयत्न करीत असातना त्यांना दि.२५/०९/२०२५ रोजी सांयकाळी शिताफिने ताब्यात घेतले. सदर महिलांना त्यांचे नांव पत्ता विचारले असता त्यांनी आपले नाव-१. संगीता दत्तु शेगर (शितोळे) वय ३० वर्षे रा.एकलासपुरवाडी, झारवाडी, ता. भालकी, जि. बिदर राज्य कर्नाटक सध्या रा. निकंबेनगर केगांव सोलापूर येथे पाल मारुन २. सौ. गिला जालींदर रामराव साळुंखे वय ३० वर्षे, रा. संभाजी नगर, जळकोट ता. तुळजापूर जि. धाराशिव सध्या रा. निकंबेनगर केगांव सोलापूर असे सांगीतले, सदर महिलांकडे चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबुल केले. तसेच त्या आजरोजी देखील वरील नमुद प्रमाणेच गुन्हा करण्याच्या उद्देशाने सोलापूर शहरात फिरत असल्याचे सांगीतले. त्यांचेकडून सदर गुन्हयात गेलेली रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. अशाप्रकारे फौजदार चावडी गुन्हे प्रकटीकरण पथकाने कौशल्यपुर्ण तपास करुन २४ तासाच्या आत गुन्हा उघड करुन पुढील आणखी गुन्हे करण्यापासुन प्रतिबंध केला आहे. सदर महिलांना अटक करण्यात आली असुन त्यांना रिमांड रिपोर्टसह मा. न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने पोलीस कोठडी दिली आहे. सदर महिलांकडे त्यांनी अशाच प्रकारचे आणखी गुन्हे केले आहेत का याबाबत तपास करण्यात येत आहे. तरी पोलीसातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, जोगवा मागण्याच्या बहाण्याने महिलांना घाबरवुन त्यांची देवाच्या नावाने फसवणूक करुन अफवा पसरवणे असे कोणी कृत्य करत असेल तर त्यांनी जवळच्या पोलीस ठाणे येथे जावून तक्रार करावी असं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत यांनी केल आहे
सदरची कामगिरी
पोलीस आयुक्त .एम. राजकुमार साो, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, मा. सहा. पोलीस आयुक्त विभाग १, प्रताप पोमण वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राउत, दुपोनि तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षिरसागर, पोह/प्रविण चुंगे, पोना/शिवानंद भिमदे, पोकों/ सुधाकर माने, पोकों/अजय चव्हाण, पोकों/पंकज घाडगे, पोकों/ विनोद व्हटकर, पोकों/कृष्णाथ बरे, पोकों/विनोदकुमार पुजारी, पोकों/शशिकात दराडे, पोकों/सुरज सोनवलकर यांनी बजावली आहे.
