Type Here to Get Search Results !

20 वर्षांपासून गंभीर गुन्हे दाखल असलेला फरार आरोपीला पिस्टल सह अटक स्थानिक गुन्हे शाखेची दमदार कामगिरी

 



   सोलापूर (प्रतिनिधी) अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप यांना नवरात्र महोत्सव कालावधीत सोलापूर ग्रामीण जिल्हयात मालाविषयी गुन्हयांना प्रतिबंध करुन जिल्हयाच्या अभिलेखावरील मोक्का, दरोडा, जबरी चोरी, घरफोडी यासारखे गंभीर गुन्हयातील पाहिजे व फरारी असलेल्या आरोपींचा, अवैध अग्निशस्त्र बाळगणाज्या इसमांची माहिती काढून कारवाई करणेबाबत आदेशित केले होते. त्यानुसार 

स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप यांनी त्यांचे अधिपत्याखालील दुय्यम अधिकारी व अंमलदार यांना सूचना दिल्या होत्या.

  दिनांक 24/09/2025 रोजी सपोनि विशाल वायकर व त्यांचे पथक मंगळवेढा उपविभागात हजर असताना, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मंगळवेढा ते पंढरपूर जाणाज्या बायपास रोडवर एक रेकॉर्डवरील आंतरराज्य गुन्हेगार हा आपले कब्जात देशी बनावटीचे पिस्टल बाळगून थांबलेला आहे. सदर बातमीच्या अनुषंगाने सपोनि विशाल वायकर यांना सदर ठिकाणी जावून कारवाई करणेबाबत आदेश दिले. त्यानुसार सपोनि विशाल वायकर व त्यांचे पथक सदर ठिकाणी जावून पाहिले असता, बातमी प्रमाणे एक इसम संशयितरित्या थांबलेला दिसून आला. तेंव्हा त्यास सापळा रचून ताब्यात घेवून त्यास नांव गांव पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नांव विकास भिमशा भोसले वय 55 वर्षे रा. तामदर्डी ता. मंगळवेढा जि. सोलापूर असे असल्याचे सांगितले. त्याचे अंगझडतीमध्ये 01 देशी बनावटीचे पिस्टल व 02 जिवंत काडतूसे मिळून आले असून त्याचा रेकॉर्ड अभिलेख तपासला असता, तो मोक्का, दरोडा, जबरी चोरी यासारख्या गंभीर गुन्हयात 20 वर्षापासून फरार असून त्यावर महाराष्ट्रसह कर्नाटक राज्यात गुन्हे दाखल आहेत. 

 सदरबाबत पोकॉ/ 454 हरीष थोरात स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण यांचे फिर्यादीवरुन मंगळवेढा पोलीस ठाणे गुरनं 762/2025 भारतीय शस्त्र अधिनियम 3, 7, 25 प्रमाणे गुन्हा दाखल असून आरोपीस 05 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर झाली असून सदर गुन्हयाचा तपास मंगळवेढा पोलीस ठाणेचे सपोनि जोग हे करीत आहेत.

आरोपी नामे विकास भिमशा भोसले वय 55 वर्षे रा. तामदर्डी ता. मंगळवेढा जि. सोलापूर हा खालील गुन्हयातील पाहिजे असलेला आरोपी आहे.

अ.क्र. पोलीस ठाणे गुरनं कलम

*01 ) मंगळवेढा 139/2018 भादवि 395 व मोक्का प्रमाणे*

02) मंगळवेढा 84/2018 भादवि 379, 353, 308 प्रमाणे

03) मंद्रुप 85/2006 भादवि 399 प्रमाणे

04) मंद्रुप 54/2015 भादवि 394 प्रमाणे

05) कामती 54/2021 भादवि 307 प्रमाणे

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संजय जगताप यांचे नेतृत्वाखाली सपोनि विशाल वायकर, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक म.इसाक मुजावर, सफौ/ नारायण गोलकर, प्रकाश कारटकर, निलकंठ जाधवर, पोहेकॉ/ विरेश कलशेट्टी, मोहन मनसावाले, पोकॉ/ राहूल दोरकर, हरीष थोरात, अक्षय डोंगरे, सुनिल पवार, महिला पोकॉ/ दिपाली जाधव यांनी बजावली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.