सोलापूर (प्रतिनिधी ) अक्कलकोट तालुक्यात अनेक ठिकाणी रुग्णाच्या जीवाशी खेळणारे बोगस डॉक्टर असून कोणतेही वैद्यकीय शिक्षण नसताना देखील अक्कलकोट तालुका मध्ये अनेक ठिकाणी डिग्री नसलेले बोगस डॉक्टर बिनदीक्कीतपणे रुग्णावर उपचार करत असून या बोगस डॉक्टरमुळे अक्कलकोट तालुका मधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून चुकीच्या उपचारामुळे एखादा रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे अश्या बोगस डॉक्टर चा वेळीच शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज आहे गोरगरीबांना तज्ज्ञ डॉक्टरची फी परवडत नाही तसेच बोगस डॉक्टरांची वैद्यकीय उपचारासाठी फी देखील कमी असल्याने रुग्ण उपचारासाठी या बोगस डॉक्टरकडे जातात हा डॉक्टर बोगस असल्याचे रुग्णाला देखील समजत नाही. शिवाय रुग्ण देखील अश्या बोगस डॉक्टर च्या वैद्यकीय शिक्षण बाबत अधिक चौकशी करत नाहीत त्यामुळे वर्षानुवर्षे अक्कलकोट तालुका मध्ये बोगस डॉक्टर उघडपणे व्यवसाय करत आहेत अक्कलकोट तालुका मध्ये बोगस डॉक्टरांची डोकेदुखी अनेक वर्षांपासून सुरु असून बोगस डॉक्टरमुक्त करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी व तालुका वैद्यकीय अधिकारी हे कोणतेही प्रयत्न करीत नसल्याचा गंभीर आरोप करत पत्रकार अमोल कुलकर्णी यांनी अक्कलकोट तालुक्यातील बोगस डॉक्टर वर कारवाई करण्या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली असून कारवाई ची मागणी केली आहे.
