सोलापूर (प्रतिनिधी ) गणेशोत्सव व ईद ए मिलाद च्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याकरिता २८ ऑगस्ट रोजी रात्री १२ ते ११ सप्टेंबर रोजी रात्री १२ या कालावधीसाठी जमावबंदी व प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. मंगळवारी (ता. २६) पोलिस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील यांनी हा आदेश काढला.
सार्वजनिक ठिकाणी मिरवणुका काढण्यास, सभा घेण्यास, पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई राहणार आहे. विवाह, अंत्ययात्रेला हा आदेश लागू राहणार - नाही. मात्र, मिरवणुका, मोर्चा, रॅली, ...
आंदोलन, निवेदन देणे, धरणे व सभा यासाठी पोलिसांची पूर्वपरवानगी बंधनकारक राहणार आहे.
तसेच या काळात शस्त्रे, तलवारी, भाले, सुरे, बंदुका, काठ्या किंवा झेंडा असलेली काठी किंवा इजा करण्यासाठी वापरा येणारी कोणतीही वस्तू, ज्वालाग्राही अथवा स्फोटक पदार्थ बाळगणे, दगड अथवा शस्त्रे साठविणे, व्यक्ती, मृतदेह यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिकरीत्या घोषणा देणे, गाणी म्हणणे, वाद्य वाजविणे, वेगवेगळ्या जमातीच्या भावना दुखावतील अशा असभ्य हावभाव व भाषेचा वापर, त्यांच्यात तंटा निर्माण होईल अशी सोंगे, चिन्हांचा प्रचारासाठी वापर यास प्रतिबंध राहणार आहे. असा आदेश पोलीस उपायुक्त डॉ अश्विनी पाटील यांनी काढला आहे .
0 Comments