Type Here to Get Search Results !

खाकी वर्दीतला देवमाणूस वाई चे डिवायएसपी बाळासाहेब भालचीम राष्ट्रपती पदकाने सन्मानित.




सातारा (प्रतिनिधी ) सातारा जिल्ह्यातील वाईं तालुकाचे कर्तव्यदक्ष पोलीस उप अधीक्षक बाळासाहेब भालचिंम यांना राष्ट्रपती पदक मिळाले आहे. उत्कृंष्ट कामगिरीबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला आहे. वाई तालुक्याचे पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांना प्रदीर्घ सेवेमध्ये केलेल्या गुणवत्तापूर्ण उत्कृंष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. बाळासाहेब भालचिम हे मागील सव्वा दोन वर्षापासून वाई येथे पोलीस उप अधीक्षक म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी यापूर्वी नागपूर शहर नांदेड,सोलापूर मुंबई,कोल्हापूर शहर व सातारा जिल्ह्यातही आपल्या प्रदीर्घ सेवेमध्ये गुणवत्तापूर्ण उत्कृंष्ट कामकाज केले आहे. त्यांनी तपास केलेले गुन्हे आणि दाखल केलेले दोषारोप पत्र, न्यायालयात सिद्ध होऊन अनेक गुन्हेगारांना शिक्षा झालेली आहे. त्यांच्या कामाची पद्धत नेहमी वेगळी राहिलीअसून आपल्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन करून बरोबर घेवुन जाण्याची त्यांची कामाची शैली आहे. तपास कामातही त्यांचा चांगलाच हातखंड होता. त्यांच्या विविध जिल्ह्यातील केलेल्या उत्कृंष्ट कामगिरीमुळे यापूर्वीही त्यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे पोलीस पदक, पोलीस महासंचालकांचे पदक आणि आता राष्ट्रपती पदक मिळाले आहे. त्यांचे सातारा जिल्हा पोलिस दलातून तसेच सर्वांकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.