मोहोळ (अमर पवार)
अर्धनारी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथील पाण्याच्या तळ्याशेजारी वन विभागांमध्ये दाट झुडपामध्ये अघोरी विद्याचा प्रकार दिसून आला त्यामुळे अर्धनारी व घोडेश्वर व आसपासच्या गावांमधील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अर्धनारी ग्रामपंचायत चे कर्मचारी पाणीपुरवठा विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी गेले असता त्यांना तो प्रकार दिसला. या प्रकारामध्ये लिंबू भोपळा दाबन सुया काळी बाहुली व शेळीचे पिल्लू (पाट) हळद कुंकू इत्यादीने पूजा केलेले साहित्य पाहिले. झालेला हा प्रकार त्याने तो अर्धनारी ग्रामपंचायतचे सरपंच श्री पांडुरंग पवार यांना कळविला व सरपंच श्री पांडुरंग पवार यांनी तो झालेला प्रकार कामती पोलीस स्टेशनला कळविला. पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी कापड उचलून पाहिले असता कापडाखाली जिवंत शेळीचे पाटरू चारही पाय बांधून पुरलेले निदर्शनास आले. हे सर्व साहित्य उध्वस्त करण्यात आले आहे व हा सर्व प्रकार कोणी केला आहे त्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत असे कामती पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री ज्ञानेश्वर उदार यांनी सांगितलेतसेच घाबरण्याचे काही कारण नाही असेही म्हणाले आहे. हा सर्व घडलेला प्रकार निंदनीय आहे व त्याचा तपास पोलीस प्रशासन करत आहे त्यामुळे कोणीही नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असे अर्धनारी ग्रामपंचायतचे सरपंच श्री पांडुरंग पवार यांनी नागरिकांना सांगितले आहे.
