सोलापूर (प्रतिनिधी) शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील दोरगे यांची पदोन्नतीने नाशिक येथे बदली झाली आहे. त्यामुळे शहर गुन्हे शाखेची जबाबदारी कोणाकडे सोपविली जाणार? याची सर्वांनाच उत्सुकता होती. पोलिस आयुक्त एम राज कुमार यांनी त्याठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांची नेमणूक केली आहे.
सहायक पोलिस आयुक्ताची पदोन्नती नाकारणारे श्री. अरविंद माने यापूर्वी फौजदार चावडी पोलिस ठाण्याची जबाबदारी सांभाळत होते. त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती.त्यांच्या काळात फौंजदार पोलीस ठाणे हद्दीतील अनेक गुन्हे उगडकीस आणण्यात त्यांना यश प्राप्त झाले होते हद्दीत कायदा सूव्यवस्था राखण्यात श्री अरविंद माने यांचा हातखंडा होता परंतु गृह विभागाच्या आदेशामुळे पदोन्नती
नाकारल्याने त्यांची काही दिवसांपूर्वी मुख्यालयात बदली करण्यात आली होती. शहर गुन्हे शाखेचे सुनील . दोरगे यांची पदोन्नतीने बदली झाल्याने त्यांच्या जागेवर कोणाची वर्णी लागणार? याकडे सोलापूर शहर पोलिस दलातील सर्वांचेच लक्ष लागले होते. प्रत्येक इच्छुकांनी त्यांच्यापरीने प्रयत्न केले, पण वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्याकडे सोलापूर शहर गुन्हे शाखेची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय पोलिस आयुक्तांनी घेतला. आता शहरातील चोरी विशेषतः दुचाकी चोरी, बंद घरांमधील चोरी, घरफोडी, चेन स्नॅचिंग अशा गुन्ह्यांवर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद माने हे निश्चितच चांगले काम करतील त्याच बरोबर सोलापूर शहरातील गुन्हेगारावर वचक निर्माण करून शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यात यशस्वी होतील अशी अपेक्षा जनतेमधून व्यक्त केली जात आहे.
