सोलापुर (प्रतिनिधी) राष्ट्रतेज अटल कामगार गृहनिर्माण संस्थेच्या सदनिकेच्या हस्तांतरणासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापुरच्या दौर्यावर आले होते.
या वेळी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, म्हाडाचे प्रकल्प अधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते सदनिकेचं वितरण करण्यात आलं.
यावेळी अटल कामगार गृहनिर्माण संस्थेचे मार्गदर्शक व आमदार विजयकुमार देशमुख यांनी थेट मुख्यमंत्र्यासमोर पक्षांतर्गत कुरघोडी सोलापुरात होत असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यासमोर केल्याने सोलापुरातील भाजपा च्या कार्यकर्त्यांकडुन आश्चर्य व्यक्त होत आहे ! चाळीस वर्षांपासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे. त्यांची अडवणूक होत आहे. जर ही अडवणूक आणि कुरघोड्या थांबल्या नाहीत तर आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ! असं परखड मत आमदार विजयकुमार देशमुख यांनी व्यक्त केले. या अनुषंगाने 40 वर्षांपासून भाजपा त काम करणाऱ्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या कुचंबणे बद्दल तर ते बोलत नाहीत ना अशी चर्चा कार्यकर्त्यांमधून होतीय. वास्तविक 40 वर्षांपासून काम करणारे अनेक कार्यकर्ते भाजपाला सोडून गेले आहेत त्यांच्या मागे कोणाचा जाच होता ? असा प्रश्न पक्षातील काही जेष्ठ परंतु एकाकी पडलेल्या कार्यकर्त्यांनी विचारला ! अनेकांनी त्रास झाल्यानंतर कसे वाटते हा प्रश्न विचारला आहे? याप्रसंगी “जे पेराल ते उगवेल” ह्या म्हणीची आठवण झाली असे एका जेष्ठ कार्यकर्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर संगीतले ! विजयकुमार देशमुख यांनी बोलल्याप्रमाणे पक्षामध्ये 40 वर्षापासून अन्याय व पार्सिलिटी झाल्यामुळे कोपऱ्यात पडलेले अनेक कार्यकर्ते आहेत! त्यांच्या प्रश्नाला कोणीतरी वाचा फोडल्याबद्दल हे कार्यकर्ते समाधान व्यक्त करत आहेत ! पक्षांमध्ये बाहेरून आलेल्या कार्यकर्त्यांना आज सुसंधी मिळत आहेत परंतु वर्षानुवर्ष घरादाराची राख रांगोळी करून अनेक कार्यकर्त्यांनी हा पक्ष वाढवला सजवला त्या कार्यकर्त्यांना आज साधं कार्यकारी दंडाधिकारी सुद्धा करण्याचे प्राधान्य मिळत नाही . तुमचे वय आणि उपयुक्तता संपल्याने तसेच तुमच्या भागातील इतर पक्षातून आलेल्या नेतृत्वाचं पक्षाच्या वरिष्ठांनीच तुष्टीकरण करून भाजपाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याला पक्षांतर्गत विरोध केला व जुनं कोणतही नेतृत्व मोठं होऊ नये याची खबरदारी बाळगल्याने हा अन्याय घडला आहे याचे अतिव दुःख या जेष्ठ कार्यकर्त्यांना आहे. परंतु याच धोरणामुळे
आमदार विजयकुमार देशमुख यांना कुठल्या अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला सामोरे जावे लागत आहे हे समजण्याएवढे भाजपा कार्यकर्ते अनभिज्ञ नाहीत.
सोलापुर शहर मध्य मतदार संघांचे युवा आमदार देवेंद्र कोठेंनी पाठीमागून येऊन धडाडीची कार्यक्षमता दाखवत जनतेच्या अडी अडचणी “देवयज्ञ” च्या माध्यमातुन सोडवित असताना जुन्या लोकांना डावलून नवीन व्यक्तीला ताकद दिल्यानंतर काय वेदना होतात याचा अनुभव होत आहे. वर्षानुवर्षे चाळीस वर्षांपासून काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना बाजुला ठेवून कुजवण्यात यशस्वी झालेल्या नेतृत्वाला ज्याप्रमाणे नवनवीन कार्यकर्ते पुढे आणावे लागले आणि त्यांना ताकद देऊन मोठे करावे लागले त्याचप्रमाणे आज वरच्या स्तरावर हा प्रयत्न करून जे पेराल तेच उगवेल या म्हणीचा प्रत्यय दिला आहे असे चाळीस वर्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्याने सांगितले ! वास्तविक देवेंद्र कोठे हे मूळचे शहर उत्तरचेच नेतृत्व असून ज्या भागांमध्ये भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नाहीत त्या भागातून त्यांचे नेतृत्व उमलले आहे शहर उत्तर मधील प्रभागातून ते निवडून येतात तिथे एक दोन जण सोडले तर भाजपाचा कोणीही नेता व कार्यकर्ते नाहीत अशी माहिती आहे. आत्ता देवेंद्र कोठे यांना आणखीन एक राजकीय लाभ म्हणजे ज्या कोठे कुटुंबाचे घरकुल भागातून प्राबल्य आहे त्या भागात दिवंगत महेश कोठे यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे यांना घेऊन जर त्यांनी विडी घरकुल हा भाग जिथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व पदाधिकारी आहेत त्यांना आपल्या नेतृत्वाखाली भाजपात आणले तर देवेंद्र कोठे आहे पुढील काळात म्हणजे जेव्हा 33% महिला आरक्षण झाल्यानंतर मध्य जर महिला राखीव झाला तर कदाचित देवेंद्र कोठे हे स्वतःसाठी शहर उत्तर चा मतदारसंघ मजबूत करून निवडणूक लढवतील असाही कयास पक्षश्रेष्ठींनी केल्याचे दिसते! शहर मध्यच नव्हे तर शहर उत्तरमधील नागरिकांना आमदार देवेंद्र कोठेंच्या कामांची चुणुक दिसुन येत आहे.
शहर उत्तरच्या राजकारणाला वेगळी कलाटणी येत्या काळात मिळणार असुन अनेक दिग्गज नेते हे आमदार देवेंद्र कोठेंच्या नेतृत्वात भाजपा पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे.
एकंदर पाहता सोलापुर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुखांना पक्षातंर्गत कुरघोडी येत्या काळात झाल्यास यात वावगे ठरणार नाही.
