सोलापूर (प्रतिनिधी ) शहर पोलीस दलात सदर बझार पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षक संजीवनी व्हट्टे यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलीस उपनिरीक्षक संजीवनी व्हट्टे या मूळ अक्कलकोट तालुक्यातील करजगी या गावच्या कन्या. असून त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण करजगी येथे पूर्ण झाले. त्यानंतर ग्रॅज्युएशनचे शिक्षण मुरूम येथे पूर्ण करून पुढील एम ए इंग्लिश हे पुणे विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण करत असताना त्यांनी MPSC एमपीएससी राज्यसेवा परीक्षेची तयारी केली.पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण होऊन घवघवीत यश मिळवले. 2022 पासून महाराष्ट्र पोलीस दलात सोलापूरातील सदर बझार पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होत्या त्यांनी सदर बझार पोलीस ठाणे याठिकाणी उत्तम कामगिरी बजावली असून. त्यांच्या उत्तम कामगिरी मुळे त्यांना बसव रत्न पुरस्कार नारी सन्मान पुरस्कार रमाईची लेख पुरस्कार यांसह अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे त्यांची जुलै 2025 महिन्यात (API) सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी (मुंबई ) येथे पदोन्नती झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्वचस्तरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
