सोलापूर (प्रतिनिधी) दुचाकीवर येऊन महिलांचे दागिने हिसकावून पसार होणाऱ्या इराणी टोळीतील एका चोरट्याला सोलापूर गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे.त्याच्याकडून पाच तोळ्याचे मंगळसूत्र हस्तगत केले आहे. चोरटे
तोंड झाकून दुचाकीवरून
यायचे आणि महिलांच्या जवळ आल्यावर त्यांच्या गळ्यातील दागिने हिसका मारून घेऊन पसार व्हायचे. या इराणी टोळीतील आणखी तीन साथीदार फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. या टोळीने महाराष्ट्र व उत्तर प्रदेशात चेन स्नॅचिंगचे गुन्हे केल्याचे तपासात समोर आले आहे. अलिराजा ऊर्फ अलिरजाक
ऊर्फ लल्ला शेखू बेग (इराणी) (वय ३१, रा. शिवाजी नगर, टीपीएस रोड, परळी, जि. बीड) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे
मीरा एस. शिवाजी उबाळे (वय ६३, रा. फस्ट मेन थर्ड कॉर्स, बेंगलोर, कर्नाटक) यांच्या फिर्यादीवरून सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता
मीरा उबाळे या कुटुंबासह तुळजापूर येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या. देवदर्शन आटोपून २७ जुलै रोजी दुपारी बंगळुरूकडे जाण्यासाठी सोलापूर रेल्वे स्टेशनजवळील गांधी पुतळ्याजवळ आल्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी उबाळे यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसका मारून चोरून नेले होते.
रेकॉर्डवरील चेन स्नॅचर अलीराजा बेग याने हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले त्याचा माग काढत शहर गुन्हे शाखेचे पथक लातूर येथे पोचले. तेथील एका टायर्स दुकानात तो येणार असल्याची माहिती मिळाली होती. सापळा लावून अलीराजा बेग यास ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्या कडून मंगळसूत्र हस्तगत केले.
सदरची कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार डॉ अश्विनी पाटील उपायुक्त गुन्हे शाखा राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदार संदीप जावळे विनोद रजपूत राजकुमार पवार इम्रान जमादार उमेश पवार सिद्धाराम देशमुख अजय गुंड सतीश काटे बाळासाहेब काळे सायबर पोलीस ठाणेकडील प्रकाश गायकवाड व मछिंद्र राठोड यांनी केली आहे.
