सोलापूर (प्रतिनिधी) येथील जेलरोड पोलीस ठाणे हद्दीतील खुलेआम चालणाऱ्या जुगार अड्डयावर कारवाई होण्यासाठी सोहेल जहागीरदार या युवकाने आंदोलन सुरु केले असून या बाबत जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्त यांना निवेदन सादर केले आहे तसेच जेलरोड पोलीस हद्दीतील अवैध व्यवसायास पोलिसांची मूक संमती असल्याचा गंभीर आरोप केला आहे जेलरोड हद्दीतील अवैध धंदे
संविधान विरोधी व बेकायदेशीर कृत्याबाबत जेलरोड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर देखील कारवाई करण्याची मागणी केली आहे वारंवार पत्रव्यवहार करून सुद्धा जेलरोड पोलीस प्रशासनाने खुलेआम जुगार अड्ड्यांना मोकळीकपणा दिलेला आहे लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना याचे गांभीर्य पोलीस प्रशासनांना नसून फक्त आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी अवैध जुगार अड्डे सुरू करण्यात आलेले आहेत. आंदोलनाचा पाचवा दिवस असून देखील जेलरोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये खुलेआम जुगार अड्डे सुरू असल्याचे निदर्शनास येत आहे याकडे पोलीस अधिकारी कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला असून याबाबत
महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 नुसार राज्यात जुगार खेळणे, जुगार अड्डे चालविणे व त्यांना संरक्षण देणे हे दंडनीय गुन्हे आहेत.
तरीही,साईबाबा चौक, राजेंद्र चौक , भोलाबाई चौक या ठिकाणी बेकायदेशीर जुगार अड्डे खुलेआम सुरू असल्याचं तक्रारीत म्हटलं असून
जुगार अड्डे चालवणारे, जुगार अड्ड्यांना जागा देणारे व जुगार अड्ड्यांना संरक्षण देणारे यांच्यावर संघटित गुन्हेगारी सारखे अथवा तडीपारची कायदेशीर कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे जेलरोड पोलीस ठाणे हद्दीतील बेकायदेशीर पणे चालणाऱ्या जुगार अड्डयावर कश्या पद्धतीने कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
.jpg)