प्रतिनिधी (प्रतिनिधी ) सोलापूर येणाऱ्या
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या वतीने शांतता कमिटीची बैठक मांगल्य मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली. या बैठकीस विभाग २ चे सहाय्यक पोलीस आयुक्त खीरडकर, विजापूर नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड, पोलीस निरीक्षक वराळे तसेच विजापूर नाका पोलीस हद्दीतील सर्व गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीत गणेशोत्सव शांततेत व पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करावा
,परवानगीशिवाय डिजिटल ध्वनीप्रक्षेपकाचा वापर होणार नाही,
ऑनलाइन सुविधा उपलब्ध करून परवानगी मिळवता येईल, लेझरशो वर बंदी पारंपरिक वाद्यांना मात्र परवानगी,वर्गणी ऐच्छिक असावी,सक्ती नको,
लायटिंग सुरक्षित पद्धतीने करावे, धार्मिक भावना दुखावणार नाही
अशा पद्धतीने देखावे व उत्सव साजरा करावा,व्यसनमुक्त गणेशोत्सवाचे आयोजन करावे. बैठकीच्या माध्यमातून सर्व मंडळांना कायदेशीर नियमांचे पालन करून उत्सव साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले.
