सर्किट बेंच म्हणजे न्यायालयाचे एक तात्पुरते ठिकाण असते.उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती येथील प्रकरणे चालवतात.यांची स्थापना करण्याचा अधिकार राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीना असतो आणि त्याची अधिसूचना राज्यपाल प्रसिद्ध करतात.खंडपीठ मात्र कायमस्वरूपी स्वरूपाचे असते.यासाठी घटनात्मक प्रक्रिया आवश्यक असते.उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रस्ताव तयार करून सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवतात.त्यास मंजुरी मिळाल्यावर राष्ट्रपती अधिसूचना काढतात.न्यायदानाची पद्धत आणि प्रक्रिया सारखीच असते.मात्र, सर्किट बेंचमध्ये न्यायमूर्तीची नियुक्ती तात्पुरती असते,तर खंडपीठामध्ये कायमस्वरूपी असते.कोल्हापूरचे सर्किट बेंच भविष्यात खंडपीठात होण्याची शक्यता आहे.
१. खंडपीठ म्हणजे काय ? न्यायिक भाषेत, खंडपीठ म्हणजे अशी जागा जिथे न्यायमूर्ती खटल्यांची सुनावणी करण्यासाठी बसतात.
उदा; मुंबई उच्च न्यायालयाचे प्रधान खंडपीठ मुंबईत आहे.ते उच्च न्यायालयाचे मुख्य आसन आहे.
प्रधान खंडपीठाव्यतिरिक्त,मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर,औरंगाबाद आणि गोवा येथे कायमस्वरूपी खंडपीठे आहेत.ही खंडपीठे सातत्याने कार्यरत असतात आणि त्यांच्याकडे कायमस्वरूपी कर्मचारी, न्यायालये आणि रजिस्ट्री असतात.
२.सर्किट खंडपीठ म्हणजे काय ?
सर्किट खंडपीठ हे कायमस्वरूपी नसते, ते विशिष्ट प्रदेशातील वादकांना तात्पुरता दिलासा देण्यासाठी तयार केले जाते.मुख्य उच्च न्यायालयाचे (किंवा दुसऱ्या स्थायी खंडपीठाचे) न्यायमूर्ती वेळोवेळी त्या शहरात खटला सुनावणी करण्यासाठीं प्रवास करतात (सर्किट बेंचसाठी).हे पूर्णवेळ खंडपीठ नाही; अधिसूचित झाल्यावर ते विशिष्ट सत्रांसाठी बनते.
