सोलापूर (प्रतिनिधी ) जोडभावी पेठ पोलिसांनी गुरुवारी (ता. १४) दुपारी बाराच्या सुमारास रविवार पेठेतील एका घरावर छापा टाकून एक किलो ५८८ ग्रॅम गांजा पकडला. याप्रकरणी एकाला अटक केली असून त्याला न्यायालयाने
पाच दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
दादासाहेब वसंत भोसले (वय ३१, रा. जोशी गल्ली, रविवार पेठ, सोलापूर) असे कोठडीतील संशयिताचे नाव आहे. रविवार पेठेतील एकाने विक्रीसाठी घरात गांजा आणल्याची खबर जोडभावी पेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक शबनम शेख यांच्या पथकाने त्या घरावर छापा टाकला. तेव्हा त्या घराच्या दरवाजाच्या कोपऱ्याजवळ आढळलेल्या
पोत्यातील पिशवीत एक किलो ग्रॅम गांजा आढळला. पोलिसांनी दादासाहेब भोसले याला ताब्यात घेऊन अटक केली. त्याला न्यायालयासमोर उभे केले असता पाच दिवसांची कोठडी मिळाली.
.jpg)