Type Here to Get Search Results !

फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांची उल्लेखनीय कामगिरी




सोलापूर (प्रतिनिधी ) शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आपली परिपूर्ण कर्तव्यनिष्ठा, धाडसी वृत्ती आणि तपास कौशल्य दाखवत फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. अरविंद माने यांनी नुकतीच एक मोठी व उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.


फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा क्र. ३०७/२०२५, भारतीय दंड संहिता (बीएनएस ३०९ (४), ३ (५)) अंतर्गत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत, अरविंद माने व त्यांच्या टीमने आरोपीला अचूक पकडले. आरोपीकडून गुन्ह्यातील रु. ४०,०००/- किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.


याशिवाय, फौजदार चावडी, जेलरोड, सदर बझार आणि विजापूर नाका पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण ५ जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले. या तपास मोहिमेत पोलिसांनी एकूण रु. ५,९६,५००/- किंमतीचे सुमारे ७.५ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. ही कामगिरी केवळ तांत्रिक कौशल्यावर आधारित नव्हे, तर पोलिस दलातील समन्वय, सखोल माहिती संकलन, गुप्त बातमीदारांचे नेटवर्क आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने यांच्या नेतृत्वगुणांची साक्ष देणारी आहे.


या उल्लेखनीय यशाबद्दल पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी अरविंद माने यांचे विशेष अभिनंदन केले आहे. महाराष्ट्र पोलीस दलाच्या उज्वल परंपरेत भर टाकणारे हे कार्य निश्चितच प्रेरणादायी ठरते. अशा धाडसी व कार्यक्षम अधिकाऱ्यांमुळेच सामान्य नागरिकांमध्ये पोलिस यंत्रणेवरील विश्वास वृद्धिंगत होतो.


अरविंद माने यांचं हे कर्तव्यनिष्ठेचं व अतुलनीय कामगिरीचं उदाहरण सर्व पोलीस अधिकाऱ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरेल यात शंका नाही. अशाच धाडसी व निष्पक्ष कार्यामुळे महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा अजून भक्कम होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.