Type Here to Get Search Results !

पत्रकार सुरक्षा समिती जिल्हा सरचिटणीस बंडू तोडकर यांचा अनेक पत्रकारांच्या उपस्थितीत सोलापूर येथे सत्कार.




सोलापूर ( प्रतिनिधी ) पत्रकार सुरक्षा समितीचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस तथा साप्ताहिक कार्यसम्राट वृत्तपत्राचे मोहोळ तालुका प्रतिनिधी बंडू तोडकर यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष तानाजी माने यांच्या शुभहस्ते शाल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तसेच त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.




यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार  मराठवाडा कार्याध्यक्ष प्रवीण राठोड जिल्हा अध्यक्ष राम हुंडारे जिल्हा उपाध्यक्ष अमर पवार सोलापूर शहर अध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस ) महिला शहर अध्यक्ष रंक्षदा स्वामी कार्याध्यक्ष राजू वग्गू सचिव अरुण सिडगिद्दी समन्वयक लक्ष्मण सुरवसे संघटक कबीर तांडूरे दैनिक लोकशाही मतदार चे संपादक अक्षय बबलाद भीम आर्मी सोलापूर शहर अध्यक्षा विशाखा उबाळे अजमेर शेख   योगेश स्वामी अशोक खेडगीकर कल्याणी कुंभार बेलीफ इत्यादी पत्रकार बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.