सोलापूर : विमानसेवा सुरू होण्यापूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापूरकरांना विमानसेवा संदर्भात गुड न्यूज लवकर देणार असल्याचे सांगायचे, उशिरा का होईना त्यांनी गुड न्यूज दिली. अखेर विमानसेवा सुरू झाली. विमानसेवा सोबत सोलापुरात नवीन उद्योग आणून सोलापुरातील स्थलांतरही थांबवू, असे त्यांनी आश्वासन दिले होते. या संदर्भात पालकमंत्री गोरे यांना पत्रकारांनी एका पत्रकार परिषदेत विचारले. आपण एक कमिटमेंट पूर्ण केली आहे. दुसरी कमिटमेंट कधी पूर्ण करणार, असे विचारताच त्यांनी सोलापुरात आयटी उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. त्यामुळे आता सोलापुरात कधी उद्योग येतील, कधी एकदा आयटी कंपन्यांचे आगमन होईल.. विमानसेवेसाठी तब्बल १५ वर्षे वाट पाहावे लागले. आता आयटी उद्योगासाठी आणखी किती वर्षे वाट पाहावी लागेल, अशी कुजबुज सामान्य सोलापूरकरांमध्ये सुरू आहे.
