Type Here to Get Search Results !

वारीच्या तोंडावर रक्त टंचाई ऑनकॉल सह इमर्जन्सी शिबिरांसाठी धावपळ.


 

सोलापूर (प्रतिनिधी ) शहर व जिल्ह्यात रक्ताची तीव्र टंचाई आहे. ऑनकॉल रक्तदात्यांना पाचारण करून रक्त संकलनाचे प्रयत्न सुरू आहेत. शहराची रोजची १५० रक्त पिशव्यांची गरज भागेनाशी झाली आहेत. त्यात वारीसाठी सोलापूर शहरात किमान पाचशे रक्त पिशव्यांचा साठा तयार ठेवण्याची सूचना आली आहे. रक्त पिशव्यांची सध्याची टंचाई पाहता दात्यांना रक्तदानाचे आवाहन करण्यात येत आहे.


शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या धावपळीत सध्या रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाली. तसेच अचानक झालेल्या पावसाने आजारी पडणाऱ्यांची संख्या वाढल्याने रक्तदानासाठी दाते देखील रक्तदानासाठी पुढे येत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे रक्तपेढ्या कॉल करून रक्त दात्याना आवाहन करून रक्त पिशव्याचे संकलन करत आहेत मात्र त्यातूनही वाढती मागणी पुरवणे अशक्य झाले आहे 

शहरात दमानी रक्त पेढीतून दर महिन्याला thyale simiya व रक्त आजाराच्या बालकांना रक्त द्यावे लागते या रूगाची संख्या 120 आहे मात्र महिनाभरा पासून रक्त पिशवी उपलब्ध होतं नसल्याने हे रक्त पेढीत चकरा मारत आहेत या स्थितीत वारी तोंडावर आल्याने राज्य शासनाने सोलापूर जिल्ह्यात किमान पाचशे रक्त पिशव्या उपलब्ध कराव्यात अशी सूचना केली आहे त्यामुळे जिल्हाभरात इमर्जन्सी रक्तदान शिबिरे घेतली जातात.

शहरातील विविध रक्त पेढ्यातील उपलब्ध रक्त पिशव्या

सिद्धेश्वर 10


म. बसवेश्वर 88


बोल्ली 41 


मेडिकेअर 34


अक्षय 00


सिव्हील ३०


अथर ०८


डॉ. हेडगेवार 02


दमाणी 26  

अश्विनी 00 

रक्त संकलन ची धावपळ 

मागील पंधरवड्यात रक्त टंचाई दूर करण्यासाठी इंडियन ऑइल कॅम्प पाकणी चंडक गार्डन मित्र परिवार सेडा व्यापारी संघटना ए एस फाउंडेशन इमर्जन्सी रक्तदान शिबिरे घेतली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.