Type Here to Get Search Results !

आषाढी, मोहरम उत्सव शांततेत पार पाडावा -पोलीस आयुक्त एम राजकुमार.




सोलापूर (प्रतिनिधी ) जुलै महिन्यात हिंदू धर्मियांची आषाढी एकादशी व मुस्लीम धर्मियांचा मोहरम सण एकाच दिवशी असल्याने दोन्ही धर्मातील लोकांनी एकमेकांच्या भावनांचा आदर करून उत्सव शांततेत पार पाडावा, असे आवाहन पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांना केले.


सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयामध्ये पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या अध्यक्षतेखाली मोहरम उत्सवाच्या अनुषंगाने सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधिकारी, शांतता समिती सदस्य, सोलापूर महानगरपालिकेकडील अधिकारी, शहर काझी, मुस्लीम धर्मगुरु, मौलाना, शहरातील प्रमुख मशिदीचे विश्वस्थ यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आयुक्त एम राजकुमार बोलत होते.

या बैठकीची प्रस्तावना उपायुक्त श्रीमती डॉ. दिपाली काळे यांनी करुन बैठक आयोजन करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. या बैठकीत उपस्थित शांतता समिती सदस्य व इतरांनी समस्या /सुचना मांडल्या. त्यानंतर सदर सुचनेचे संबंधित महानगर पालिका अधिकारी यांनी सदर कामाची रुपरेषा बघुन समस्या सोडविण्यात येतील असे सांगितले.

या बैठकीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे, विजय कबाडे, सहायक पोलिस आयुक्त प्रताप पोमण, सुधिर खिरडकर, राजन माने, सोलापूर महानगरपालिकेचे सागर खरोसेकर, महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रदिप मोरे, धर्मादय कार्यालयाकडील असिफ शेख, अग्निशामक दल कडील समीर पाटील, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडील किरण चव्हाण, आर. टी.ओ. कडील अधिकारी, सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार, व शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.