Type Here to Get Search Results !

गुन्हेगारांपर्यंत पोचण्यासाठी व्हॉट्सअॅप ग्रुप पोलीस उपअधीक्षक संकेत देवळेकर यांची संकल्पना ग्रुपमध्ये महामार्ग वरील ढाबे, हॉटेल्स अन् बस चालक यांचा समावेश




मोहोळ (अमर पवार) पुण्यातील कुख्यात गुंड शाहरुख शेख लांबोटी (ता. मोहोळ) येथे एन्काउंटर झाल्यानंतर पोलीस प्रशासन अलर्ट झाले आहे. गुन्हेगारांपर्यंत लवकर पोचता यावे अथवा त्याची माहिती लवकर मिळावी यासाठी विभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या कल्पनेतून सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावरील सर्व ढाबे, चालक व महामार्गावरून धावणाऱ्या ट्रॅव्हल्स बसचे चालक या सर्वांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक संकेत देवळेकर दिली. यावेळी पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे व अन्य पोलीस अधिकारी उपस्थित होते.

सराईत व अन्य गुन्हेगार पुणे मुंबई , अन्य मोठ्या शहरांतून विविध गुन्हे करून पोलिसांच्या भीतीने

पलायन करून कामगार म्हणून ढाबे व हॉटेल्सचा आधार घेतात. ढाबे व हॉटेल चालकांना मजुरांची 

मोठी अडचण असते. त्यामुळे ढाब्यावर येणाऱ्या एखाद्या व्यक्तीने किंवा गुन्हेगाराने मला कामाची गरज आहे काम द्या, असे म्हटले तर हॉटेल व ढाबे चालक तयार होतात. मात्र आपण कामावर ठेवलेला कामगार नेमका कोण आहे,

याची माहिती त्या व्यावसायिकांना नसते. केवळ कामासाठी मजूर मिळाला यातच ते समाधान मानतात. ज्यावेळी पोलिस एखाद्या गुन्ह्याच्या चौकशीसाठी किंवा संशयिताच्या मागावर ढाबा किंवा हॉटेलमध्ये येतात व त्या ठिकाणी पोलिसांना गुन्हेगार मिळून आल्यावरच ढाबा व हॉटेल चालकाला आपण ठेवलेला कामगार गुन्हेगार असल्याचे समजते

राष्ट्रीय महामार्गालगतचे मोठे व्यावसायिक आपण ठेवलेला कामगार कोण आहे, त्याचे आधार कार्ड व अन्य कागदपत्रांची पडताळणी करीत नाहीत. त्यामुळे एखाद्या गुन्हेगाराला आसरा देणे हे नियमबाह्य असून, या प्रकरणी व्यावसायिकांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता नाकारता येतं नाही. कामगारांची व त्यांच्या कागदपत्रांची माहिती पोलिस ठाण्याला कळविणे गरजेचे आहे मात्र तसे होताना दिसत नाही त्यामुळे महामार्गालगतच्या सर्व व्यावसायिकांचा व्हॉट्स ग्रुप तयार करण्याची संकल्प राबविण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.