सोलापूर (प्रतिनिधी ) गेल्या कित्येक दिवसांपासून शहर पाणी पुरवठा नियोजनाचे काम सोलापूर महानगर पालिकेकडून विस्कळीत असून त्याचा फटका सोलापूर शहर - जिल्हा वासियांना बसतोय . पाणी पुरवठा नियोजनाचे काम लवकरात लवकर मार्गी लागावे. शहराचा पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी प्रभाग १ च्या वतीने चार हुतात्मा चौक परिसर ते सोलापूर महानगर पालिकेवर मोर्चा काढण्यात आला.
हा मोर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर - जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार, कार्याध्यक्ष जुबेर भाई बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली व शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आला.
सुरुवातीस चार हुतात्मा चौक परिसरातील चार हुतात्म्यांना अभिवादन करून हा मोर्चा काढण्यात आला.मोर्चा दरम्यान महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
*सोलापूर महानगर पालिकेचा धिक्कार असो, होश मै आओ होश मै आयुक्त साहेब होश मै आओ ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो अश्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.*
या प्रसंगी माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे शहर - जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार,शहर उपाध्यक्ष सुजित अवघडे , महिला शहर संघटक शोभा सोनवणे यांनी पाणी पुरवठा विस्कळीत बाबत प्रथम सोलापूर महानगर पालिकेतील प्रशासकांचा निषेध केला. राज्यात महायुतीचे सरकार अतिशय चांगले काम करीत असताना स्थानिक पातळीवर सोलापूर महानगर पालिकेच्या प्रशासनाच्या
गलथान कारभाराचा फटका सोलापूरकरांना बसत आहे . त्या विरोधात सोलापूर महानगर पालिकेला वठणीवर आणण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे म्हणाले.
या मोर्चा प्रसंगी जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले , शहर सचिव दत्तात्रय बनसोडे,वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी,वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख,मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज आबादीराजे, प्रज्ञासागर गायकवाड , सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे,कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे,कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर , यांच्यासह प्रभाग १ मधील स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती ....
