Type Here to Get Search Results !

परिमंडळ ब विभागातील भ्रष्ट शिवभोजन केंद्रावर कारवाई करण्यास टाळा टाळ करणाऱ्या अन्न धान्य वितरण अधिकारी विरोधात 4 जून पासून बेमुदत उपोषण.




सोलापूर (प्रतिनिधी ) गोरगरीब व गरजू लोकांना सवलतीच्या दरात जेवण मिळावे कोणीही गोरगरीब व गरजू उपाशी राहू नये म्हणून महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्यात शिवभोजन केंद्रे सुरू केले होते गोरगरीब गरजू व लोक कल्याणासाठी ही योजना राबविण्यात येत असून दोन चपाती एक वाटी डाळ एक वाटी तांदूळ असे जेवण  गोरगरीब व गरजू लोकांना दिले जाते .

महाराष्ट्र राज्यातील शिवभोजन केंद्रांना शहरी भागात राज्यसरकार कडून अनुदान दिले जाते.

 परिमंडळ कार्यालय ब विभागातील काही शिवभोजन केंद्रात स्टीलची भांडी नसणे शिवभोजन केंद्रातील कर्मचाऱ्यांना हातमोजे टोपी नसणे स्वयंपाकासाठी फिल्टर पाणी नसणे वॉश बेसिन नसणे घरगुती गॅसचा वापर सीसीटीव्ही नसणे एकाच व्यक्तीचा अनेक वेळा फोटो काढणे त्याच बरोबर शिवभोजन थाळी पार्सल देणे  त्याच बरोबर शिवभोजन केंद्रात अन्न न शिजवणे असा प्रकार आढळून येत आहे  या बाबत जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी दिनांक 22/ 4/2025 रोजी परिमंडळ अधिकारी ब विभाग यांच्या कडे लेखी स्वरूपाची तक्रार केली होती परंतु परिमंडळ अधिकारी ब विभाग यांनी कोणतेही कारवाई केलेली नाही सदरची बाब अतिशय गंभीर असून शिवभोजन केंद्राच्या मूळ उद्देशाला हरताळ फासणारी आहे 

 परिमंडळ कार्यालय ब  विभागातील काही शिवभोजन केंद्रात 

    अनेक प्रकारचे दोष आहेत अशा शिवभोजन केंद्रामुळे  राज्य सरकार ला लाखों रुपयांचा अनुदान पोटी चुना लागत आहे.

 राज्य सरकार ला अनुदानपोटी लाखों रुपयांना गंडवणाऱ्या शिवभोजन केंद्राची  स्वतंत्र अधिकाऱ्यामार्फत तपासणी करून राज्य सरकार च्या तिजोरी वर डल्ला मारणाऱ्या व शिवभोजन केंद्र चालकांवर कारवाई करावी  तसेच

 परिमंडळ कार्यालय ब विभागातील सर्वच शिवभोजन केंद्राच्या तपासणी साठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करून दोषी असलेल्या शिवभोजन केंद्रावर कारवाई करावी तसेच त्यांना आजपर्यंत दिलेल्या अनुदानाची रक्कम वसुल करण्यात यावी तसेच शिव 

भोजन केंद्र चालकावर फौंजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून दोषी असलेल्या शिवभोजन केंद्राची मान्यता रद्द करण्यात यावी याबत जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांनी सोलापूर चे कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे दिनांक 9/ 5 / 2025 रोजी लेखी स्वरूपाची तक्रार केली असून कारवाई ची मागणी केली होती परिमंडळ ब विभागातील काही शिवभोजन केंद्रात अनेक ठिकाणी अनियमितता असून सदर प्रकार अतिशय गंभीर याबत अन्न धान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे यांनी परिमंडळ ब विभागातील शिवभोजन  केंद्राची ना तपासणी केली ना कारवाई केली भ्रष्ट शिवभोजन केंद्राना ते पाठीशी घालत असल्याने अन्नधान्य वितरण अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी व अन्य जिल्ह्यात बदली करणे बाबत जेष्ठ पत्रकार यशवंत पवार यांचे बुधवार दिनांक 4/6/2025 पासून जिल्हाधिकारी  सोलापूर येथे बेमुदत उपोषणास सुरवात करणार आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.