Type Here to Get Search Results !

विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडून पालखी मार्ग व तळावरील कामांची पाहणी.




सोलापूर (प्रतिनिधी ) आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील पालखी मुक्कामाची ठिकाणी, विसावा ठिकाणी तसेच पालखी मार्गावर करण्यात आलेल्या कामांची पाहणी केली. तसेच पालखी तळावर आवश्यक त्या ठिकाणी मुरमीकरण, सपाटीकरण याची पाहणी केली.

      तसेच मुक्काम व विसावा ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, पाऊस आल्यानंतर जलावरोधक मंडप कोणत्या ठिकाणी उभे केले जाणार आहेत या अनुषंगाने माहिती घेऊन वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही यासाठी प्रशासनाने काळजी घेण्याबाबत त्यांनी सूचित केले. 

      नातेपुते, सदाशिवनगर, माळशिरस, वेळापूर, भंडीशेगाव, वाखरी, पिराची कुरवडे, बोरगाव, अकलूज सराटी या सर्व पालखी मुक्काम ठिकाणाची पाहणी विभागीय आयुक्त श्री. पुलकुंडवार यांनी केली. यावेळी माळशिरसचे तहसीलदार सुरेश शेजुळ, पंढरपूर तहसीलदार सचिन लंगुटे, अधीक्षक अभियंता संजय माळी, पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे रोकडे. तसेच संबंधित तलाठी ग्रामसेवक व सरपंच आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.