सोलापूर (प्रतिनिधी) :- दिनांक ०९/०६/२०२५ रोजी, सोलापुर शहरातील भवानी पेठ येथील ओंकार ज्वेलर्स दुकानाचे लोखंडी शटरचे कुलूप तोडुन, आत प्रवेश करुन, दुकानातील चांदीचे व सोन्याचे दागिणे चोरुन नेलेबाबत फिर्यादी यांचे तक्रारीवरून, अज्ञात चोरटयाविरुध्द जोडभावी पेठ पोलीस ठाणे, सोलापुर शहर येथे गुरनं. ३९९/२०२५, भा.न्या.सं.क.३३१ (३),३३१(४), ३०५(A) प्रमाणे दि.१०/०६/२०२५ रोजी गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाचे अनुषंगाने, गुन्हे शाखेकडील स.पो.नि./विजय पाटील, पो.स.ई./मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथक यांना, खात्रीशीर बातमी मिळाली दोन इसम हे चोरीचे चांदी व सोन्याचे दागिणे घेऊन ०२ नंबर बस स्टॅन्ड, शास्त्री नगर, सोलापुर येथे थांबले प्राप्त बातमीची शहानिशा करून, कारवाई करणेकामी सदर ठिकाणी जावुन, आरोपी नामे-सिध्दनाथ ऊर्फ ढेप्या गंगाधर बंडगर, वय-२१ वर्ष, रा.मड्डी वस्ती, भवानी पेठ, सोलापुर व एक विधिसंघर्षित बालक यांना, चोरी केलेले चांदीचे व सोन्याचे दागिन्यासह ताब्यात घेण्यात आले त्यांचेकडे गुन्हयाच्या अनुषंगाने, अल्पवयीन बालकाचे नातेवाईक यांचे समक्ष अधिक चौकशी केली असता, त्यांनी वरील प्रमाणे दाखल गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यानुसार, जोडभावी पेठ पोलीस ठाणे गुरनं. ३९९/२०२५, भा.न्या.सं.क.३३१ (३), ३३१ (४), ३०५ (A) अन्वये दाखल गुन्हयातील १२२० ग्रॅम चांदीचे वस्तु व ०३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असे एकुण ०१,७२,०००/- रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहेत.
सदरची कामगिरी. एम. राज कुमार पोलीस आयुक्त, सोलापूर शहर डॉ. दीपाली काळे पोलीस उप-आयुक्त गुन्हे/वि.शा राजन माने, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली, स.पो.नि./विजय पाटील, पोसई/मुकेश गायकवाड व पोलीस अंमलदार सफौ/नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्डे, राहुल तोगे, आबाजी सावळे, संजय साळुंखे, अजिंक्य माने, धिरज सातपुते, विठठल यलमार, मपोह/शिलावती काळे, चालक-सतीश काटे यांनी केली आहे.
